आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘समाजसुधारणेसाठी महिलांनो, झोकून द्या’, जमायते इस्लामी हिंद परिसंवाद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - स्त्रियांनी स्वत:ला कमजोर न समजता समाजसुधारणेसाठी झोकून द्यावे, असे मत शफिका नसीर साहेबा यांनी व्यक्त केले. जमायते इस्लामी हिंद महिला विभागातर्फे ‘इस्लाम की बेटी जाग जरा’ या व इतर विषयावर रविवारी आमखास मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी महिलांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती. बीना अबरार म्हणाल्या की, महिलांची उपस्थिती ही स्त्रियांवर अत्याचार करणार्‍यांविरुद्धची मूक चळवळ आहे. महिलांनी नेहमीच समाजातील कुप्रथा, विकृती यांच्याविरुद्ध लढा दिला आहे. याच भावनेला जागृत करण्यासाठी जमायते इस्लामी हिंदने महिला विराट मेळावा आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. ‘मेरा इमान मेरी जिंदगी’ या विषयावर मार्गदर्शन करताना अतिया सिद्दिकी यांनी सांगितले की, कमी होत चाललेला प्रामाणिकपणा दृढ करण्यासाठी प्रयत्न केले जावेत. समाजातील वाईट प्रवृत्तींनी महिलांविरोधात मोठे षड्यंत्र रचले असून, त्याविरोधातील लढय़ासाठी नेहमी तयार राहावे लागणार आहे. कार्यक्रमात महाराष्ट्र सल्लागार समिती सदस्य डॉ. जावेद मुकर्रम सिद्दिकी यांनी ‘औलाद की तबीयत हम कितने बाखबर’ या विषयावर आपले महत्त्वपूर्ण विचार मांडले. ‘प्रेषितांचे सहाबा आदर्श चरित्र’ या विषयावर मुबश्शरा फिरदोस यांनी मार्गदर्शन केले. तौफिक अस्लम खान यांनी समारोप केला. खालेदा अमतू अजीज यांनी आभार मानले.