आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेतील रेल्वे स्थानकावर महिला, बालकांसाठी जननी सेवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रेल्वे प्रशासनाने प्रवासादरम्यान महिला आणि लहान मुलांना येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन नवीन जननी सेवा सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात औरंगाबादसह सर्व महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवरील कँटीनमध्ये महिला आणि बालकांसाठी किफायतशीर दरात दर्जेदार आहार उपलब्ध करून दिला जाईल. यात गरम दूध, गरम पाणी, सेरेलॅक, लॅक्टोजन, बूस्ट, हॉर्लिक्स तसेच महिलांसाठी विशेष खाद्यपदार्थ मिळतील.
विभागीय व्यवस्थापक डॉ. अखिलेशकुमार सिन्हा यांच्या हस्ते मंगळवारी नांदेड विभागातील पहिल्या ‘जननी सेवा’ केंद्राचे उद््घाटन करण्यात आले. अशाच प्रकारची जननी सेवा परभणी, जालना, औरंगाबाद आणि नांदेड विभागातील इतर महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर सुरू करण्यात आली.