आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जनशताब्दी’ मनमाडपर्यंतच; प्रवाशांचे हाल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नाशिकजवळ मालगाडी घसरल्याने मुंबईहून येणारी तसेच मनमाडकडे जाणारी रेल्वे वाहतूक चार तास विस्कळित झाली. औरंगाबादहून मुंबईला जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस मनमाड येथूनच परत पाठवल्याने प्रवाशांचे हाल झाले. शेकडो जणांनी बस, टॅक्सी व अन्य वाहनांची मदत घेऊनच मुंबई गाठावी लागली.
नाशिकजवळ गुरूवारी सकाळी मालगाडीचे डबे घसरले. नाशिक रेल्वे प्रशासनाने तातडीने मनमाड, औरंगाबाद, मुंबई येथे संपर्क साधला. तत्पूर्वीच जनशताब्दी सकाळी सहा वाजता औरंगाबादेतून मुंबईकडे रवाना झाली होती. ती मनमाडला रोखण्यात आली. नाशिकच्या पुढचा मार्ग बंद असल्याने प्रवाशांनी जमेल त्या मार्गाने मुंबईला जावे, असे सांगण्यात आले. प्रवाशांना तिकीटाचे पैसेही परत करण्यात आले.
दरम्यान, रेल्वे कर्मचाºयांनी वाहतूक सुरळीत केल्याने शुक्रवारी जनशताब्दी नियोजित वेळापत्रकानुसार मुंबईला जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.