आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Japan Mayor Sending Message For Students In Aurangabad

मुलांनो, स्वत:तील सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद शहर महास्वच्छता अभियानासाठी जपानमधील क्योटो शहरातील महापौर दाईसाकू कादोकावा यांनी शहरातील विद्यार्थ्यांसाठी खास संदेश पाठवला आहे. या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करतानाच आई-वडील, शिक्षक आणि ज्येष्ठांचा आदर करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. कामात प्रामाणिक राहा. स्वत:तील सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा, असेही ते म्हणतात.
जपानी भाषेतील त्यांच्या संदेशाचा स्वैर अनुवाद पुढीलप्रमाणे :
मी क्योटो शहराचा महापौर आहे. आमच्या शहराची लोकसंख्या १५ लाखांच्या वर आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील शाळांमध्ये टॉयलेट क्लीनिंग आणि इतर स्वच्छता अभियान राबवत आहे. मला हे एकून आनंद झाला की, तुम्ही विद्यार्थी तुमच्या शाळा आणि शहर स्वच्छता करण्याच्या मोहिमेत सहभागी झाला आहात. अॅरिगाटो म्हणजेच ‘मी तुमच्यावर खूप प्रेम करतो.’ आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी या शब्दाचा वापर केला जातो. आपले पालक, शिक्षक, ज्येष्ठ आणि इतर सर्वांबाबतच तुम्ही या भावना व्यक्त करण्यास विसरू नका. आपल्या प्रत्येक कामात सर्वोत्तम द्या. हे अभियान देशभरात पसरेल, अशी मला खात्री वाटते.
औरंगाबादेतील अभियानात सहभागी होण्यासाठी मी येतआहे.

चिमुकल्यांनो, तुम्हा सर्वांना माझे मनापासून खूप खूप प्रेम...
पोते द्या : गेल्या दोन अभियानांत आपापल्या भागातील कचरा पॉलिथिन पिशव्यांत भरण्यात आला होता. नंतर या पिशव्या मनपा वाहनात टाकून डेपोत कचरा नेण्यात आला होता. यंदा डीबी स्टारने सुरू केलेल्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी पॉलिथिन बॅगविरोधी मोहिमेमुळे आयोजकांनी पॉलिथिन िपशव्यांऐवजी पोते म्हणजेच गनी बॅगचा वापर करण्याचे ठरवले आहे. यासाठी अभियानाला येताना सर्वांनी आपल्यासोबत एक पोते आणावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.