आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Japanese Industrialists Interested In Jewellery Industry

जपानी उद्योजकांना ज्वेलरी उद्योगांत रस, वाळूज, शेंद्र्यासह डीएमआयसी क्षेत्राला भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जपानमधील चौदा लघु उद्योग औरंगाबादेतील डीएमआयसीत येण्यास उत्सुक असून औरंगाबादच्या लघु उद्योजकांशी ऑटोपार्टससह, औषधी, फूड्स उत्पादनात सामंजस्य करार करण्यास तयार आहेत. खास करून औरंगाबादेत ज्वेलरी मेकिंगचे कारखाने सुरू करण्याची इच्छाही काही जपानी उद्योजकांनी बोलून दाखवली.

१६ ते १८ एप्रिल या तीन दिवसांत जपानच्या उद्योजकांनी औरंगाबाद शहरातील वाळूज, शेंद्र्यासह डीएमआयसी क्षेत्राला भेट दिली. तीन दिवस हे शिष्टमंडळ शहरात होते. त्यांनी रविवारी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्ससोबत सामंजस्य करार केला. त्यानंतर सीएमआयएच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणी केली. या वेळी सीएमआयएचे अध्यक्ष आशिष गर्दे , मुनीष शर्मा, मिलिंद कंक यांच्यासह मूळचे औरंगाबादचे सध्या जपानमध्ये स्थायिक असलेले चैतन्य भंडारी उपस्थित होते. शर्मा यांनी अौरंगाबादेतील उद्योग आणि भविष्यातील संधीबाबत प्रेझेंटेशन दिले. त्यांनतर जपानी उद्योजकांनी वाळूज, शेंद्र्यासह डीएमआयसी क्षेत्राची पाहणी केली.

जपानमध्ये ज्वेलरी मेकिंगचे अनेक उद्योग आहेत. तसा उद्योग औरंगाबाद शहरात सुरू करता येईल काय, याचीही चाचपणी त्यांनी केली. ऑटोपार्ट,औषधी फूड्स उद्योगात स्थानिक लघु उद्योजकांशी सामंजस्य करार करण्याची तयारीही त्यांनी दाखवल्याचे सीएमआयचे अध्यक्ष आशिष गर्दे यांनी सांगितले.