आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवता जनआंदोलनाचा नगर शहरात मूक मोर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथील तिहेरी दलित हत्याकांडाचा निषेध करत या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी मानवता जनआंदोलनाच्या वतीने शुक्रवारी मूक मोर्चा काढण्यात आला.
जनआंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष विजय पाथरे, प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. भानुदास होले यांच्या नेतृत्वाखाली लालटाकी येथून मोर्चाला सुरुवात झाली. काळ्या फिती लावून आंदोलकांनी घटनेचा निषेध केला. दिल्ली दरवाजा, चितळे रस्ता, नवीपेठ, माणिक चौक, खिस्तगल्लीमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. आरोपींच्या अटकेस होत असलेल्या दिरंगाईचा निषेध नोंदवत त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली. जिल्हाध्यक्ष प्रमोद वाघमारे, प्रमिला जगताप, जिजाभाऊ जाधव, अरुण चव्हाण, जालिंदर जरे, संजय गाडे, वंदना भिंगारदिवे, मंगल भिंगारदिवे, मीरा जाधव, संगीता गाडे, आशा सोनवणे, विमल जगताप, सुजाता कंडेपल्ली आदी या आंदोलनात सहभागी झाले.