आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध पक्ष, संघटनांकडून जवखेडे हत्याकांडाचा निषेध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातील विविध पक्ष, संघटनांनी जवखेडे हत्याकांडाचा निषेध केला आहे.आरोपींवर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, जाधव कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, यासह विविध मागण्या निवेदनांद्वारे करण्यात आल्या आहेत.
भारिप बहुजन महासंघ : जवखेडे हत्याकांडातील आरोपींवर कडक कारवाई करून त्यांना तत्काळ फाशी देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन भारिप बहुजन महासंघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जाधव कुटुंबीयांना शासनाने 50 लाखांची आर्थिक मदत द्यावी, आरोपींना तत्काळ अटक करावी यासह विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. या वेळी महासंघाचे जिल्हा सचिव भारत दाभाडे, अमित भुईगळ, पंडितराव तुपे, श्रीरंग ससाणे, मंगेश निकम, दिनेश साळवे, भगवान खिल्लारे, प्रा.डॉ. प्रज्ञा साळवे, माणिक करवंदे, अ‍ॅड. रमेश खंडागळे, कैलास बनकर, प्रल्हाद सातुरे, जितेंद्र शिरसाठ, गौतम लांडगे, राष्ट्रपाल तुपे, शेषराव निकाळजे, कुणाल खरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समन्वय प्रतिष्ठान : खैरलांजी, खर्डा आणि जवखेडे हत्याकांडाविरोधात केवळ मोर्चे, आंदोलने, जाळपोळ करून चालणार नाही, तर सर्व समाजाच्या नेत्यांनी मतभेद विसरून ठोस कृती कार्यक्रम तयार करण्याची गरज आहे. यासाठी सर्वांनी एकत्र मोर्चा काढण्यासाठी बैठक बोलावून सुसंवाद साधावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर समन्वय प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे. या वेळी प्रतिष्ठानचे वीरेंद्र जाधव, आशिष सोनवणे, अ‍ॅड. एस. बी. गायकवाड, आतिष खरात, सतीश जाधव, भरत राजपूत आदींसह सर्व सभासद उपस्थित होते.
स्वाभिमानी यूथ रिपब्लिकन पक्षातर्फे 13 नोव्हेंबरला निदर्शने : जवखेडे गावातील जाधव कुटुंबाच्या हत्याकांडाला 15 दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी पोलिसांना आरोपींचा शोध लागला नाही. ज्या अधिकाऱ्यांनी कामात दिरंगाई केली आहे, त्यांना बडतर्फ करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. येत्या पाच दिवसांत आरोपींचा शोध लागला नाही, तर 13 नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येतील, असा इशारा स्वाभिमानी यूथ रिपब्लिकन पक्षातर्फे निवेदनात देण्यात आला आहे. या वेळी पक्षाचे महाराष्ट्र उपनेते शब्बूभाई लखपती, मराठवाडा अध्यक्ष सर्जेराव मनोरे, जिल्हाध्यक्ष राजू साबळे, राहुल साळवे, अ‍ॅड. मनोज सरीन, सागर कुलकर्णी, सुरेश शिनगारे, देवानंद खंदारे, राजेंद्र जगताप, रमेश जावळे, रोहित थोरात, सुनील खरात आदींची उपस्थिती होती.