आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवानाच्या पत्नीचा दोन महिने हातगाडीवर संसार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ‘युद्धस्य कथा रम्या’ असे म्हणतात, परंतु युद्धभूमीवर लढणार्‍या वीरांच्या कुटुंबीयांना हलाखीला कसे सामोरे जावे लागते याचा प्रत्यय या घटनेमुळे आला. कन्नड तालुक्यातील आडगावचा जवान तिकडे निकराने लढत होता आणि इकडे त्याची पत्नी हलाखीचे जीवन जगत होती. कारगिल शहीद दिनाच्या पूर्वसंध्येला ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने आडगावात जाऊन माजी सैनिकांची परिस्थिती जाणून घेतली तेव्हा कारगिल युद्धातील जवान सदाशिव भोसले आणि त्याची पत्नी शारदा यांनी हा कटू अनुभव कथन केला. या वेळी या दांपत्याचे डोळे पाणावले आणि अंगावर शहारे आले.

हे गाव सैनिकांचे !
आडगाव सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. गावाची लोकसंख्या जेमतेम दोन हजार असून दोनशे घरांत विस्तारलेली आहे. काही घरांचा अपवाद वगळता प्रत्येक घरातील एक ते तीन सदस्य देश संरक्षणाच्या कार्यात गुंतले असून त्यांच्या आई-वडिलांना याचा अभिमान वाटतो. गावातील 130 जण सैन्यात होते. त्यापैकी 70 सैनिक निवृत्त झाले असून 60 जण कार्यरत आहेत. गावातून आणखी 30 तरुण सैन्यात जाण्यासाठी धडपड करत आहेत.

आडगावला शौर्यगाथेची किनार
आडगावाच्या इतिहासाला शौर्यगाथेची किनार लाभली आहे. 1937 मध्ये फकीरराव हैबतराव भोसले यांना संरक्षणाची आवड असल्याने ते ग्वाल्हेरच्या तुकडीत भरती झाले. त्यानंतर त्यांनी दोन-तीन तरुणांना सैन्यात दाखल करून घेतले. दुसर्‍या महायु़द्धात त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांचा शासनाकडून शौर्यपदक देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या कामगिरीमुळे आणि शौर्यपदकामुळे गावातील तरुणांना प्रेरणा मिळाली आणि तेही लष्करात भरती झाले. तेव्हापासून या गावातील सर्वच तरुणांना सैन्यात जाण्याच्या प्रेरणेने पछाडले आहे.

एक मूल, पण जिवाची तमा नाही
गावातील नागोराव भोसले, बाबूराव भोसले, अप्पासाहेब भोसले, हरिभाऊ भोसले या सर्वांना एकुलते एक मूल होते, मात्र मुलांची जिद्द आणि सैन्यात जाण्याची इच्छा असल्याने या माता-पित्यांनी आपल्या मुलांना सीमेवर लढण्यासाठी पाठवले. एकुलत्या एक मुलांपैकी समाधान हरिभाऊ भोसले, उमेश भोसले यांची लग्ने झाली असून त्यांची पत्नी सासू-सासर्‍यांच्या सेवेत आहेत.

मरता मरता वाचले
कारगिल युद्धावेळी वसंत काशीनाथ भोसले हे पूंछ येथील पाकिस्तान-भारत सीमारेषेवर तैनात होते. ते सांगू लागले..रात्री तीन वाजता त्यांनी गस्त आटोपून बलनोई एस पोस्ट येथे अम्ब्युस लावला होता. मोठय़ा दगडावर एक एलएमजीच्या साहाय्याने जवळच्या रायफलींसह सात जण सज्ज होते. पहाटे चार वाजता लवकर अम्ब्युस संपवला. त्या वेळी अध्र्या तासाच्या अंतराने त्या दगडावर अचानक हल्ला करण्यात आल्याने तो परिसर उद्ध्वस्त झाला होता. या परिसरात आठ दिवस सतत गोळीबार होत होता. या सीमारेषेवर रात्रंदिवस खडा पहारा देऊन एकाही शत्रूला आत घुसू दिले नाही. याच काळात माझ्या आईचे निधन झाले. तिचे अत्यंदर्शनही मला घेता आले नाही.


चौघांनीच सर केली टायगर हिल
सदाशिव भोसले पुण्यात बॉम्बशोधक व नाशक कंपनीत असताना त्यांना 20 मे रोजी संरक्षण खात्याने 24 तासांत कारगिल युद्धात सामील व्हा, असे आदेश दिले. भोसले यांनी तत्क ाळ पत्नीसह मुलांना औरंगाबादला आणले. या वेळी त्यांच्याकडे फक्त एक दिवस शिल्लक होता. दोन्ही मुलांचे सोनामाता शाळेत प्रवेश करून एन-12 मध्ये रूम करून दोन महिन्यांचे भाडे दिले. दुसर्‍याच दिवशी ते युद्धभूमीवर हजर झाले. पुण्यातून 106 अभियंत्यांपैकी त्यांची निवड करण्यात आली होती. तीस जवानांच्या तुकडीतील 26 जवान युद्धाच्या धुमश्चक्रीत शहीद झाले. उरले होते केवळ चार जवान. त्यानंतर सदाशिव भोसलेंसह चौघांनी प्राणाची बाजी लावून टायगर हिल सर केली.


देशसेवेसाठी दोन्ही मुले बहाल
मुलांना आवड होती, पण ते भरती झाल्यावर काळीज फाटल्यासारखे होत होते. मात्र, देशसेवेपुढे हे कमीच होते. एकाला पाठवल्यावर दुसर्‍यालाही देशसेवेसाठी पाठवले. पुष्पा साहेबराव भोसले, सैनिक रवी-संतोष यांची आई
एकुलता एकही गेला मुलामध्ये जिद्द असल्याने त्याने आमची काळजी न करता देशसेवेचे वृत्त हाती घेतले. तो नसला तरी त्याची पत्नी आमची सेवा करते. बाबूराव भोसले, सैनिक उमेशचे वडील.

अख्ख्या गावाने घेतला देशसेवेचा वसा
माझे स्वप्न पुतण्याने पूर्ण केले
मला लष्करात जायचे होते, मात्र माझ्या भावाचा अचानक मृत्यू झाला. तेव्हा त्यांचा मुलगा सव्वा महिन्याचा होता. मला आई-वडिलांनी लष्करात जाऊ दिले नाही. म्हणून मी माझ्या पुतण्याला लष्करात पाठवले. मुलालाही तिथेच पाठवणार. कौतिक भोसले, काका किरण अप्पासाहेब भोसले, सैन्यात कार्यरत आहेत.


मित्रांच्या प्रेरणेने भरती
सैन्यात जाण्यासाठी मला मित्राची प्रेरणा व जिद्द होती. त्यामुळे भरती झालो. आजही दोन्ही मुलांची तयारी करून घेत आहे. सुभाष बैरागी, निवृत्त सैनिक

काळजी केली नाही
घरची परिस्थिती चांगली असून एकुलता एकच वारसदार होता, मात्र त्याला केवळ फौजी व्हायचे असल्याने त्याने सैन्यात पाय ठेवला. हरिभाऊ भोसले, कार्यरत सैनिक समाधानचे वडील

पहिला निमलष्करात
निमलष्करात गावातून पहिला माझा मुलगा कार्यरत आहे. गावानेच देशसेवेचा वसा घेतला आहे. हिराजी भोसले, जवान प्रमोदचे वडील.

माझा वसा त्याने घेतला
मी निवृत्त झाल्यानंतर मला वाटले होते, कुणी तरी हा वसा घ्यावा. मोठय़ा मुलाला अपयश आले, मात्र छोट्या मुलाने वसा घेतला. दामू सुस्ते, जवान समाधान सुस्तेचे वडील