आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jayabhavaninagar Campus,Latest News In Divya Marathi

तिरुपती कॉलनीत आठ दिवसांपासून फुटले चेंबर; डासांची उत्पत्ती वाढल्याने डेंग्यूचा धोका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वॉर्ड क्रमांक 81 जयभवानीनगर परिसरातील विश्वकर्मा चौकाजवळ तिरुपती कॉलनीत आठ दिवसांपासून मुख्य ड्रेनेजलाइन चोकअप होऊन चेंबर फुटले आहे. परिसरातील 50 कुटुबीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुर्गंधी, डासांची उत्पत्ती वाढल्याने डेंग्यूचा धोका वाढला आहे. आठ वर्षाचा मुलगा आणि 22 वर्षाच्या युवकाला डेंग्यूसदृश आजारामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जयभवानीनगर परिसरातील नागरिकांना सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.
पावसाचे पाणी वाहून जाणा-या नाल्याजवळ चेंबर फुटल्यामुळे संपूर्ण नाल्यात ड्रेनेजचे पाणी तुंबले आहे. डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. दिवसा दुर्गंधी तर रात्री डासांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. या भागात 25 ते 30 घरे असून नागरिक त्रस्त झाले आहेत. यासाठी तत्काळ फवारणी आणि चेंबर दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी गणेश, भिसे, प्रकाश राठोड , इंद्रसेन, ढाले, उषा इंगळे, संतोष धामणे, प्रकाश नरवडे आदींनी केली आहे.