आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांच्या हस्ते मुक्तिदिनाचे झेंडावंदन नको!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जायकवाडीच्या प्रश्नावर लढा देण्यासाठी सर्वपक्षीय 40 जणांची समिती गठित करण्यात येणार असून मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी पालकमंत्र्यांना झेंडावंदन करू देणार नाही, अशी भूमिका संघर्ष कृती समितीच्या वतीने पत्रकार भवनमध्ये आयोजित बैठकीत घेण्यात आली.

जायकवाडीच्या पाण्यावर चर्चा करण्यासाठी रविवारी (1 सप्टेंबर) सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जायकवाडीचा पाणीप्रश्न औरंगाबादकरांना समजावा यासाठी एक लाख पत्रके छापून ती घरोघरी वाटण्यात येणार आहेत. या वेळी शिवसेना आणि भाजपचा अपवाद वगळता सर्व पक्षांचे पदाधिकारी हजर होते. समितीचे संयोजक जयाजीराव सूर्यवंशी यांनी नगर जिल्ह्यातील चार तालुके आणि चार पुढारी हेच मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी मारक असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले, नगर जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर आणि अकोला या तालुक्यांत सर्वाधिक पाणी वळवले जाते. त्यामुळे 17 सप्टेंबरला पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याऐवजी स्वातंत्र्यसैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करावे. तसेच 17 सप्टेंबरला क्रांती चौकात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब कोळगे, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सराटे, मनसेचे शहराध्यक्ष सुमीत खांबेकर, शेतकरी संघटनेचे मराठवाडा प्रमुख कैलास तवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अंबादास कोरडे, द्वारकादास पाथ्रीकर, गोपीनाथ वाघ, ज्ञानेश्वर अंबोरे, दत्तू पवार आदींची उपस्थिती होती.