आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जायकवाडी धरणातील पाणी प्रदूषण समजेल जागेवर बसून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जायकवाडी धरणात विविध जलस्रोतांद्वारे पाणी येते. मात्र हे जलस्रोतच गेल्या अनेक वर्षांत प्रदूषित झाल्याने धरणातील पाणीही प्रदूषित होत आहे. पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजन एक ते दीड मिलिग्रॅम पर लिटरने कमी झाला आहे. त्यामुळे पाण्यातील जीवसृष्टी धोक्यात आली आहे. विद्यार्थ्याने सतत १४४ महिने केलेल्या संशोधनातील हे धक्कादायक निष्कर्ष आहेत. धरणातील पुढील शंभर वर्षांचे प्रदूषण जागेवरून मोजता येईल, असे अनोखे सांख्यिकी मॉडेल या संशोधक विद्यार्थ्याने आपल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शोधनिबंधात मांडले आहे.
पुरुषोत्तम सारडा हा तरुण अभियंता असून शेवगावचा राहणारा आहे. तो गोदावरी पाटबंधारे विभागात जालना येथे कनिष्ठ अभियंता पदावर नोकरी करत आहे. त्याने जायकवाडी धरणावरील पाणी परिस्थितीचे अंदाज (फोरकास्टिंग) या विषयावर पाच वर्षे संशोधन केले. एका अभियंत्याने प्रथमच जायकवाडीच्या जलपरिस्थितीवर केलेले हे दुर्मिळ संशोधन ठरले आहे. कारण त्याने १४४ महिने या धरणातील रीडिंग घेऊन बीओडी (बायलॉजिकल ऑक्सिजन डिमांड) डीओ (डिझॉल्व्ह ऑक्सिजन), इसी (इलेक्ट्रिकल कंडक्टन्स), पीएच (पाण्यातील आम्ल आणि अल्क) यांचे प्रमाण किती असते याचा प्रदीर्घ अभ्यास केला. प्रदूषण तपासण्यापेक्षा धरणावर जाऊन पाण्याचे नमुने घेत त्याचे पृथक्करण करण्याची कटकट त्याच्या संशोधनाने टळली आहे. त्याने विकसित केलेल्या सांख्यिकी मॉडेलने दहा ते शंभर वर्षांतील पाण्याचे प्रदूषण धरणावर जाता एका जागी बसून मोजता येते. या मॉडेलला फक्त डेटा द्यावा लागतो.

नोकरी सांभाळून संशोधन
^माझे संशोधन जगातील चार जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. हे मॉडेल सांख्यिकी असून त्याद्वारे पाण्याची गुणवत्ता पुढील शंभर वर्षे कशी असेल हे समजेल. -पुरुषोत्तम सारडा, संशोधक विद्यार्थी

गुणवत्तेचे उत्तम मॉडेल
^आपणहवामानाचा अंदाज जसा वर्तवतो तशी पाण्याची गुणवत्ता तिही अनेक वर्षांची या मॉडेलने वर्तवणे सोयीचे झाले आहे. हे तांत्रिक प्रकारचे संशोधन असून जलक्षेत्रातील अभियंत्यांना उपयुक्त आहे. -डॉ.पराग सदगीर, गाइड, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

धक्कादायक निष्कर्ष
वॉटर क्वालिटी डेटा या संशोधनावर काम करताना पुरुषोत्तम सारडा यांनी १४४ महिने धरणातले पाणी तपासले यात १५ महिने पाणी अाम्लारीयुक्त आढळले.
पाण्याचापीएच हा ६.५ ते ८.५ आढळला. जुलै, सप्टेंबर, डिसेंबर, जानेवारी, मे महिन्यातील नमुन्यात पाण्याला आंबट वास येतो.
यापाण्यातील विद्राव्य ऑक्सिजन हा मिलिग्रॅम पर लिटरवर खाली आला आहे. त्याचे प्रमाण ते मिलिग्रॅम पर लिटर असे असावे लागते.
सीओडी(केमिकल ऑक्सिजन डिमांड) ३० मिलिग्रॅम पर लिटरपर्यंत असावा. तो ५० ते ७५ मिलिग्रॅम पर लिटर इतका वाढला आहे. त्यामुळे हे पाणी पिण्यास वापरण्यायोग्य राहत नाही पाण्याखालची जीवसृष्टीही धोक्यात येते.
इसीअर्थात इलेक्ट्रिकल कंडक्टन्स हा १५०० पर्यंत असावा लागतो. मात्र २००१ ते २०१२ या दहा वर्षांत २२०० ते ३००० पर्यंत वाढला आहे. याचाच अर्थ क्षारांचे प्रमाण खूप वाढले ते प्रमाणाबाहेर गेले आहे.
बातम्या आणखी आहेत...