आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

22 दिवसांत वळवले 9.5 टीएमसी पाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मराठवाड्याच्या हक्काचे 12 टीएमसी पाणी आतापर्यंत वळवण्यात आले आहे. 11 ऑगस्टपासून मुळा, पालखेड, ओझरवेअर आणि नांदूर-मधमेश्वरच्या डाव्या आणि उजव्या एकूण आठ कालव्यांतून पाणी सोडणे सुरू आहे. 22 दिवसांत 9.5 टीएमसी पाणी वळवण्यात आले. जायकवाडीत पाणी येत नसल्यामुळे धरणाची पाणीवाढ थांबली आहे.

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 22.65 टक्के इतका झाला आहे. एकीकडे पाण्याचा वापर आणि बाष्पीभवनामुळे जायकवाडीचा पाणीसाठा कमी होत आहे, तर दुसरीकडे पाऊस थांबला आणि वरच्या धरणातून पाणी सोडणे बंद झाल्यामुळे जायकवाडीच्या पाण्याचा ओघही बंद झाला. दररोज मुळा, पालखेड, ओझरवेअर आणि नांदूर-मधमेश्वरच्या दोन्ही कालव्यांतून पाणी सोडणे सुरू आहे. 11 ऑगस्टला या आठ कालव्यांतून पाणी सोडण्यास सुरुवात झाली होती. 22 दिवसांत 269 दलघमी म्हणजे 9.5 टीएमसी पाणी वळवण्यात आले आहे. 11 ऑगस्टपूर्वी 66 दलघमी म्हणजे अडीच टीएमसी पाणी वळवण्यात आले. पावसाळा सुरू झाल्यापासून 335 दलघमी म्हणजे 11.82 टीएमसी पाणी पळवण्यात आले आहे.

मराठवाड्याच्या जनतेचे लक्ष जायकवाडीच्या पाण्याकडे आहे. 1 लाख 80 हजार हेक्टर जमीन जायकवाडीच्या पाण्यावर अवलंबून आहे.

सध्या मुळाच्या डाव्या कालव्यातून 300 आणि उजव्यातून 1632 क्युसेक्स, पालखेडच्या डाव्यातून- 765 आणि उजव्यातून 30 क्युसेक्स, ओझरवेअरच्या डाव्या कालव्यातून 997 आणि उजव्यातून 301 क्युसेक्स आणि नांदूर-मधमेश्वरच्या डाव्या कालव्यातून 300 आणि उजव्यातून 540 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. अहमदनगर, नाशिककडे दररोज वळवल्या जाणार्‍या पाण्याचा हिशेब केल्यास दररोज 12 दलघमी पाणी वळवले जात आहे. मुळा धरण 75 टक्क्यांवर असताना सातत्याने पाणी सोडले जात असून त्यामुळे या धरणाचा पाणीसाठा वाढला असून सध्या या धरणाचा जलसाठा 68.69 इतका झाला आहे. तसेच वाढलेल्या तापमानामुळे जायकवाडीतील पाण्याचे बाष्पिभवनाचे प्रमाण दररोज 0.78 दलघमी इतके होत आहे.