आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jayakwadia Has Its Own Water, Supreme Court Slapped Thorat, Vikhe Patil

जायकवाडीला हक्काचे पाणी; थोरात, विखे पाटलांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यास विरोध करणा-या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या. यामुळे माजी मंत्री राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात यांचे मराठवाड्याच्या हक्काचे पाणी रोखण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. पाण्यासंबंधीचा निर्णय मुंबई हायकोर्टाने घ्यावा, असे निर्देशही देण्यात आले. प्रवरानगर साखर कारखाना व हरिश्चंद्र फेडरेशन यांनी दोन स्वतंत्र याचिका दाखल करत जायकवाडीत पाणी सोडण्याच्या निर्णयास आव्हान दिले होते.
उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाने वरच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयालाही स्थगिती द्यावी, अशी मागणी केली होती.जलसाठा २८.३५ टक्क्यांवर जायकवाडीत मुळाचे पाणी ५,५०० क्युसेक वेगाने दाखल होत आहे. शुक्रवारी पाणीसाठा दीड टक्क्याने वाढून २८.३५ टक्के झाला. निळवंडेचे पाणी रविवारपर्यंत दाखल होईल.