आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साैदीत मेला ताे बीडचा फय्याज कागजीच, अतिरेक्यांनीच गेम केल्याचा संशय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/ अाैरंगाबाद - सौदी अरेबियातील मक्केत गेल्या जुलैमध्ये आत्मघाती हल्ल्यात ठार झालेला सुसाइड बॉम्बर अब्दुल्ला खान हा महाराष्ट्र पोलिसांना गेल्या दहा वर्षांपासून हवा असलेला मोस्टवॉन्टेड अतिरेकी व २६/११ हल्ल्यातील अाराेपी अबू जुंदालचा साथीदार फय्याज कागजी (बीड) असल्याचे एटीएसच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. एटीएसने अधिकृतरीत्या ही माहिती सौदी अरेबिया सरकारला कळवली आहे. दरम्यान, जुंदालच्या अटकेनंतर उपयुक्तता संपल्यानंतर कागजीचा अतिरेकी संघटनांनीच ‘गेम’ केल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली अाहे.

२००६ मध्ये पाकिस्तानमार्गे साैदीत गेलेल्या फय्याज कागजीकडे लष्कर-ए-ताेयबाने इंडियन मुजाहिदीनची विशेष जबाबदारी साेपवली हाेती. अतिरेकी कारवायांसाठी तरुणांची भरती करणे व घातपाती कारवायांसाठी अर्थपुरवठा या दाेन जबाबदाऱ्या कागजीकडे साेपवण्यात अाल्या हाेत्या. इंडियन मुजाहिदीनच्या काेलंबाे अाणि भारतातील सेलची जबाबदारी कागजीकडे हाेती. अबू जुंदालला अटक झाल्यानंतर त्याने दिलेल्या जबाबात कागजीचा प्रामुख्याने उल्लेख अाला. यानंतर कागजीच्या हालचालींना अापाेअापच मर्यादा पडल्या. शिवाय अतिरेकी संघटना अाणि त्यांच्या ‘गाॅडफादर’ असलेल्या अायएसअायसाठी कागजी अडचणीचा ठरत उर्वरित.

होता. या शिवाय जुंदालच्या अटकेनंतर कागजीच्या प्रत्यापर्णाच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. अशा स्थितीत भीषण कारवाया करण्यासाठी कागजीवर दबावही वाढला होता. मात्र, परिस्थिती बदलल्याने तो काही करू शकत नव्हता. शेवटी कागजीचा अतिरेकी संघटनांनी गेम घडवून आणला असावा असा पोलिसांचा कयास आहे.

गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि विहिंपचे प्रवीण तोगडिया यांच्या हत्येचा कट रचणारा आणि २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधारांपैकी एक असलेला हा कागजी सन २००६ मध्ये वेरुळ (जि. औरंगाबाद) येथे सापडलेल्या शस्त्रसाठा प्रकरणातही प्रमुख आरोपी होता.

सौदीत ४ जुलै २०१६ रोजी झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात ठार झालेला ३४ वर्षीय सुसाईड बॉम्बर अब्दुल्ला खान पाकिस्तानी नागरिक असल्याचा दावा सौदी तपास यंत्रणांनी केला होता. त्यावेळी सौदी प्रशासनाने अब्दुल्लाचे छायाचित्रही प्रसिद्ध केले होते. हे छायाचित्र कागजीशी कमालीचे मिळतेजुळते असल्याने अब्दुल्ला हा कागजी असल्याचा संशय एटीएसने तेव्हा व्यक्त केला होता. त्यानुसार त्या दिशेने एटीएसने तपासाला सुरूवातही केली हाेती.

सौदी अरेबियासह आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या आपल्या खबऱ्यांमार्फत एटीएसने कागजीबाबतची सर्व माहिती मिळवली असून या संपूर्ण तपासानंतर मदिना येथील आत्मघाती हल्ल्यात ठार झालेल्या अब्दुल्ला हाच कागजी असल्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बोलताना दिली.
पुढील स्लाईडवर वाचा....अबू जुंदालचा साथिदार.... म्हणून कागजी हवा होता...

(फोटो : अब्दुल्ला अाणि कागजीच्या छायाचित्रात असे अाहे साम्य.)
बातम्या आणखी आहेत...