आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • JEE Mains Examination Form Dateline Extended, Fill Up 11th January

जेईई मेन्स परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ, 11 जानेवारीपर्यंत अर्ज भरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) च्या वतीने घेण्यात येणाऱ्या जेईई मेन्स परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली असून ११ जानेवारीपर्यंत आता अर्ज करता येणार आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी दरवर्षी जेईई मेन्स परीक्षा घेण्यात येते. देशभरातील एनआयटी, ट्रिपल अायटी आणि सरकारी संस्थांत अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी जेईई ही जॉइन्ट एन्ट्रन्स एक्झाम घेण्यात येते.
यंदा ऑफलाइन परीक्षा एप्रिल रोजी, तर ऑनलाइन परीक्षा आणि १० एप्रिल रोजी होणार आहे. यापूर्वी अर्ज भरण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यात आता त्यात वाढ करण्यात आली असून विद्यार्थ्यांना ११ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. यानंतर १२ जानेवारीपर्यंत रात्री ११:५९ वाजेपर्यंत डेबिट क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शुल्क जमा होईल. मात्र, चलनाद्वारे शुल्क बँकेतूनच जमा करावे लागणार आहे.

२७ एप्रिल रोजी निकाल जाहीर होणार
>ऑफलाइनपरीक्षेसाठीचे शुल्क मुलांसाठी एक हजार रुपये, तर मुलींसाठी पाचशे रुपये
>ऑनलाइन परीक्षेसाठी मुलांकरिता पाचशे रुपये, तर मुलींसाठी अडीचशे रुपये
>मार्च २०१६ पासून ऑनलाइन प्रवेशपत्र मिळण्यास सुरुवात
>१८ ते २२ एप्रिलदरम्यान ऑनलाइन अॅन्सर की पाहता येईल
>२७ एप्रिल रोजी निकाल जाहीर होईल
>ऑल इंडिया रँक ३० जून रोजी जाहीर होईल.