आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीप, दोन दुचाकींचा विचित्र अपघात; तीन जण ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद- औरंगाबाद महामार्गावर नंद्राबादसमोर काळीपिवळी व दोन मोटारसायकलच्या झालेल्या विचित्र अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर एकाचा उपचारादम्यान मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी तर अन्य ७ किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात रात्री आठ वाजता झाला.  मृतांपैकी एकाची ओळख रात्री उशिरापर्यंत पटली नव्हती. रामदास काळे रा. पळसवाडी असे एका मृताचे नाव आहे.  क्र. एमएच २० बीटी ७१२४ ही जीप औरंगाबाद येथून ८ प्रवासी भरून निघाली होती. नंद्राबाद येथे समोरून येणाऱ्या एमएच २०  ईपी ८७८४ दुचाकी तर दुसरी दुचाकी क्र. ए एच २० ईएम २५६३  मध्ये जोरदार धडक झाली. अपघातात जखमी झालेले कैसरबी हमीद शेख २८ वर्षे, महम्मद अल्ताब  १०, शेख फर्जाना ४५ वर्षे, मुजाहेद इसाख कुरेशी २१ वर्षे हे रुग्णालयात उपचार घेत आहेत.
बातम्या आणखी आहेत...