आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वधूचे 5 तोळ्यांचे दागिने लंपास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बीड बायपासवरील रामचंद्र हॉलमध्ये सुरू असलेल्या लग्न समारंभात घुसून एका तरुण-तरुणीने वधूचे मंगळसूत्र, सोनसाखळी आणि चांदीचे पाच ग्रॅमचे नारळ असे पाच तोळ्याचे दागिने लंपास केले. शुक्रवारी सकाळी झालेली चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे.

सूतगिरणी चौकातील शालिनी बालाजी उमाटे (61) यांचा मुलगा सचिन याचा आज सकाळी 11.15 च्या सुमारास रामचंद्र हॉलमध्ये विवाह झाला. लग्नात शालिनी यांच्याजवळ असलेली दागिन्यांची पर्स त्यांनी एका ठिकाणी ठेवली. यादरम्यान एका तरुण-तरुणीने ती पर्स पळवली. 11.30 वाजता प्रकार उघडकीस आल्यानंतर सातारा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस निरीक्षक बाबूराव कंजे, उपनिरीक्षक सय्यद सिद्दीक यांनी घटनेची माहिती घेतली. दरम्यान, शालिनी या दागिन्यांची पर्स घेऊन लिफ्टने मंगल कार्यालयात जाताना त्यांच्यासोबतच तरुण-तरुणी होते. सीसीटीव्हीचे फुटेज तपासले, तेव्हा शालिनी यांनी या दोघांना ओळखत नसल्याचे सांगितले. त्या दोघांवर संशय असल्याचे कंजे म्हणाले.

सोनसाखळी हिसकावली
गारखेडा परिसरातील देशमुखनगरात उभ्या असलेल्या महिलेची दोन तोळे सोन्याची चेन शनिवारी सायंकाळी 6.30 वाजता दुचाकीवर आलेल्या चोरट्याने हिसकावली. लक्ष्मीनगर येथील मानसी रे रस्त्याच्या कडेला उभ्या असताना ही घटना घडली. जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला.