आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeweller Thakkar Murdered After Looting 35 Lack Rupees

दिवाण देवडीवर शोककळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - वैजापूर येथून बेपत्ता झालेले सराफा व्यापारी शैलेश भरतकुमार ठक्कर-चंद्राणी यांची निर्घृण हत्या झाल्याचे वृत्त धडकताच ते राहत असलेल्या दिवाण देवडी भागात शोककळा पसरली. येथील रहिवाशांनी हळहळ व्यक्त केली. दरम्यान, या हत्येच्या निषेधार्थ कासारी बाजार येथील व्यापार्‍यांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळला.

मितभाषी आणि सर्वांशी आपुलकीने वागणारे शैलेश बेपत्ता झाल्यापासूनच दिवाण देवडी भागात चिंतेचे वातावरण पसरले होते. काही जणांनी ठक्कर कुटुंबीयांच्या मदतीला धावून जात त्याचा शोध काढण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, त्यांची हत्या झाल्याचे कळल्यावर त्यांना प्रचंड धक्का बसला.

एका तरुण मुलाची अशा पद्धतीने हत्या कशी होऊ शकते, असा त्यांचा सवाल होता. त्यांनी शैलेश यांच्या बंधू आणि आईचे सांत्वनही केले. शैलेश यांच्या दोन भावांना तर दु:ख अनावर झाले होते. वर्षभरापूर्वीच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यात हे नवे संकट कोसळल्याने शैलेशच्या आईला तर बोलणेच सुचत नव्हते. दरम्यान, हत्येची माहिती मिळताच सराफा तसेच अन्य व्यापारीवर्गात संतापाची लाट उसळली. त्यांनी तातडीने बंद पुकारला. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.