आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासन जीआरची प्रत मिळेपर्यंत सराफा बाजार बंदच राहणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - केंद्रीय अर्थसंकल्पात सोने, हिरे तथा अन्य किमती रत्नजडित चांदीच्या आभूषणांवर एक टक्का उत्पादन शुल्क लागू करण्याच्या विरोधात सराफा व्यावसायिकांनी मार्चपासून बंद पुकारला आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सराफांनी केलेले स्वयंमूल्यमापन ग्राह्य धरण्याचे आश्वासन दिल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण जोपर्यंत शासन जीआरची प्रत हातात येत नाही त्यात काय लिहिले आहे हे कळत नाही तोपर्यंत सराफा बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा सराफा आसोसिएशनच्या वतीने घेण्यात आला आहे. याबाबत अनभिज्ञ असलेले पु. ना. गाडगीळ, वामन हरी पेठे, पी. बी. झेड या सराफा व्यावसायिकांनी दुकाने उघडली होती. याविरोधात असोसिएशनच्या वतीने दुकानासमोर आंदोलन करून दुकान बंद करण्यास भाग पाडले.
बातम्या आणखी आहेत...