आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jewellery Shop Owner Attack On Wife In Aurangabad

दोन घटनांनी सराफा व्यापार्‍यांत खळबळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - लक्ष्मीचा वास असलेल्या कासारी बाजारात एकाच आठवड्यात दोन अप्रिय घटना घडल्यामुळे सराफा व्यापार्‍यांत खळबळ उडाली आहे. आठ दिवसांपूर्वी स्वामीनारायण ज्वेलर्सचे शैलेश ठक्कर यांचे अपहरण करून खून करण्यात आला. याचा उलगडा होण्याआधीच सोमवारी पहाटे गोलटगावकर ज्वेलर्सचे सुनील यांनी पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली.

ठक्कर यांच्या खुनाच्या घटनेची चर्चा सुरूच असताना सोमवारी पहाटे किरकोळ वादातून सुनीलने पत्नीच्या डोक्यात रिंग पाना घातला. या घटनांमुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

इतर व्यापार्‍यांनाही धमकी. .
बायकोचा गेम केला, आता तुझाही गेम करतो, असे म्हणत पहाटे पाच वाजता रक्ताने माखलेला व्यक्ती कासारी बाजारातून सिटी चौक पोलिस ठाण्यात अवतरला. गस्तीवरील पोलिसांनी इतर व्यापार्‍यांना बोलावून जखमी महिलेस रोकडिया हनुमान कॉलनीतील सावजी रुग्णालयात दाखल केले. पत्नीचा खून केल्याचे ओरडत घराबाहेर आलेल्या सुनीलने बाहेर येताच गिरीशवर हल्ला केला. प्रसंगावधान राखत गिरीश यांनी गेटला कुलूप लावून पळ काढला. नंतर सुनीलने गिरीशचा लहान भाऊ नितीनला खाली पाठवा, त्याचा गेम करतो, असे धमकावले. सुनील ठाण्यात गेल्याचे समजताच शेजार्‍यांनी सुनीलच्या पत्नीस रुग्णालयात नेले.

संपत्ती आणि एकांतवास : वडिलांनी तुर्काबाद खराडी रस्त्यावर घेतलेली शेती सुनीलच्या वाट्यास आली होती. काही दिवस दुधाचा व्यवसाय केल्यानंतर सुनीलने जनावरांसह शेती विकून टाकली होती, तर आईच्या वाट्यास आलेल्या समतानगर येथील महिला सुधारगृहाच्या इमारतीचे भाडे मिळत होते. याच संपत्तीच्या वादातून ही घटना घडल्याची चर्चा होती.

डोक्यावर आणि शरीरभर दुखापती : महिलेच्या संपूर्ण डोक्याला असंख्य दुखापती झाल्या आहेत. डोळे, कान, खांदे, छाती व इतर ठिकाणीही जबर मार लागला आहे. त्यांना अनेक ठिकाणी टाके देण्यात आले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्या बेशुद्ध होत्या. आता त्यांची प्रकृती गंभीर असली तरी धोक्याबाहेर असल्याचे डॉ. सचिन सावजी यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

शांत स्वभावाचा सुनील
मोठा भाऊ संजय याचा मुलगा आनंद यास दहा ते बारा वर्षांपूर्वी सुनीलने दत्तक घेतले होते. सुनील शांत स्वभावाचा आणि कोणात मिसळत नव्हता. त्याचा धार्मिक स्वभाव असल्याने त्याने गणेश विसर्जनानंतर 25 जोडप्यांच्या हस्ते गणेश यज्ञ करून जवळपास तीन लाख रुपये खर्चले होते.

मुलगा राहतो विभक्त
दत्तक घेतलेला आनंद घरातील वादामुळे मागील सहा महिन्यांपासून त्याचे वडील संजय गोलटगावकर यांच्याकडे राहण्यास गेला होता. सुनीलला नवनवीन वाहनाची आवड असल्याने त्याने बुलेट आणि मुलास महाविद्यालयात जाण्यासाठी दुचाकी घेतली होती. एवढे करूनही मुलगा आपल्याजवळ राहत नसल्याने सुनील चिडचिडा झाला होता