आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिन्सी बलात्कार प्रकरणातील तिघांना न्यायालयीन कोठडी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - संजयनगर भागात 24 वर्षीय तरुणीवर बलात्कार प्रकरणी न्यायालयाने तीन आरोपींची 30 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. ओळखपरेडनंतर या सर्व आरोपींना पोलिस कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी राम बोडखे गंभीर जखमी असल्याने त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गुरुवारी (24 जानेवारी) ला रात्री 11.30 वाजेच्या सुमारास बसैयेनगर येथील मोकळ्या मैदानात कुख्यात गुन्हेगार राम बोडखेने तीन साथीदारांच्या मदतीने संजयनगर भागातील एका 24 वर्षीय युवतीवर बलात्कार केला होता. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे सामूहिक बलात्काराची घटना टळली होती. पोलिसांनी बोडखेसह प्रतीक चंचलानी (33, रा. कैलासनगर), अनिल खाजेकर (24, रा. दत्तनगर) आणि संदीप सरकटे (28, रा. बेगमपुरा) या चौघांना ताब्यात घेतले.

नागरिकांच्या मारहाणीत जखमी झालेल्या बोडखेला घाटीत दाखल करून इतर तीनही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. ओळखपरेडनंतर या सर्व आरोपींना पोलिस कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. बोडखेवरील उपचार संपल्यानंतर जिन्सी पोलिस त्याला ताब्यात घेणार असल्याचे पोलिस निरीक्षक जी.एस.पाटील यांनी सांगितले आहे.