आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेतील जिन्सी बलात्कार प्रकरणात चार रिक्षाचालकांना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मला रिक्षातून बेगमपुऱ्यातील एका खोलीत नेले. चाॅकलेटमधून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती पीडित मुलीने पोलिसांनी घेतलेल्या जबाबात विशद केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी सर्व पुराव्यांचा कसून तपास केला जात अाहे. जिन्सी भागातील एका शाळेत आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची तक्रार महिनाभरापूर्वी पोलिसात देण्यात आली अाहे. त्यानंतर आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
दोन दिवसांपूर्वी पोलिस निरीक्षक किरण पाटील आणि तपास समितीने मुलीचा पुन्हा एकदा जबाब नोंदवला. या वेळी पीडिता म्हणाली, शाळा सुटल्यानंतर मला रिक्षात बसवून नेण्यात आले होते. चौघांपैकी एक रिक्षाचालक मला नेहमी शाळेत ने-आण करत होता. याच रिक्षाचालकाने त्याच्या रिक्षाचालक मित्रांसोबत मला बेगमुपऱ्यातील एका खोली नेले आणि अत्याचार केला. नेमके कोठे नेले होते हे मात्र पीडितेला सांगता आले नाही.

यापूर्वी अरबी आणि संगणक शिकवणाऱ्या दोन शिक्षकांना अटक करण्यात आली. मंगळवारी पुन्हा एकदा पीडित मुलीचा जबाब नोंदवण्यात आल्यानंतर आणखी चार रिक्षाचालकांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाच्या समोर हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनवण्यात आली, अशी माहिती तपास अधिकारी किरण पाटील यांनी दिली.
मोहंमद हनीफ मोहंमद युसूफ (४२, रा. बायजीपुरा), शेख रफिक शेख इसाक (३६, रा. बिस्मिल्ला कॉलनी, नारेगाव), अजम अलीखान यावर अलीखान (२९, रा. नवाबपुरा) मोजम खान युसूफ खान पठाण (४०, रा. रहेमानिया कॉलनी) अशी या रिक्षाचालकांची नावे आहेत. मुख्य आरोपी शिक्षक अहमद खान आमिर खान (३८, रा. मंजूरपुरा) याला अटक केली होती. दोन दिवसांपूर्वीच चार रिक्षाचालक, एका संगणक शिक्षकाचाही सहभाग असल्याचा पीडितेच्या नातेवाइकांनी आरोप केला होता. काझी शमशोद्दीन (२८, रा. अालमगीर कॉलनी) यालाही अटक करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...