आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसरीतील चिमुकलीवर 3 रिक्षाचालक, 2 शिक्षकांनी केला बलात्कार, औरंगाबादेतील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जिन्सी भागातील एका शाळेत शिकणाऱ्या आठ वर्षांच्या मुलीवर अरबी भाषा शिक्षकाने बलात्कार केल्याच्या घटनेत आणखी घृणास्पद प्रकार समोर आला आहे. त्या मुलीवर तीन रिक्षाचालकांसह शाळेतील संगणक शिक्षकानेही अत्याचार केल्याचा आरोप बुधवारी तिच्या नातेवाइकांनी केला आहे. आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी बुधवारी (२४ ऑगस्ट) सायंकाळी प्रक्षुब्ध जमाव जिन्सी पोलिस ठाण्यासमोर जमला होता. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यावर जमाव शांत झाला. मुलीवर अत्याचार करणारा मुख्य आरोपी अहमद खान अामिर खान (३८, रा. मंजूरपुरा) यास अटक करण्यात आली असून त्याला २९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. .

शाळेचे नाव घेताच येत होता ताप
१५ दिवसांपासून या चिमुरडीने शाळेत जाण्यास नकार दिला होता. मात्र ती अभ्यासाचा कंटाळा करत असेल असे तिच्या आई वडिलांना वाटले. त्यांनी तिला बळजबरीने शाळेत पाठवले. मात्र गेल्या पाच दिवसांपासून तिला शाळेचे नाव काढले की ताप येत होता. ती खूप आजारी पडली म्हणून तिला डॉक्टरांकडे दाखवले. त्यांनी औषधोपचार करूनही ताप कमी होत नव्हता. झोपेत ती मुझे छोडो, अम्मी- अब्बा को कुछ मत करो, असे बडबडत होती. म्हणून तिला मानसोपचार तज्ज्ञाकडे दाखवण्यात आले. तेव्हा तिच्यासोबत काहीतरी भयंकर प्रकार झाला आहे, तिला प्रेमाने विचारा असे तज्ज्ञांनी सांगितले. मग तिच्या आजीने तिला स्वत:च्या घरी नेऊन आपुलकीने चौकशी केली. तेव्हा तिने शाळेतील अरबी भाषा शिक्षक अत्याचार करत असल्याचे रडत रडत सांगितले. अधिक विश्वासात घेतल्यावर तिने संगणक शिक्षक, रिक्षाचालकांची नावे उघड केली. त्यामुळे या चौघांवर गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी तिच्या नातेवाइकांनी केली. मुलीच्या बोलण्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याचेही नातलगांनी सांगितले.

आठ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या तीन रिक्षाचालकांसह संगणक शिक्षकाला अटक करण्याच्या मागणीसाठी जिन्सी ठाण्यासमोर नातलगांसह मोठा जमाव जमला होता.
पुढील स्लाईडवर वाचा...ज्या रिक्षाचालकांवर मामू म्हणून विश्वास टाकला होता त्यांनीच.... चिमुरडी अजूनही घाबरलेली... पोलिस ठाण्यासमोर जमाव...
बातम्या आणखी आहेत...