आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जितेंद्र जोशीच्या श्रमदानाने वाढवला उत्साह, पाणी फाउंडेशनच्या कामांना दिल्या भेटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद- सत्यमेवजयते वॉटर कप स्पर्धेत पाणी फाउंडेशनअंतर्गत तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरू असलेल्या जलसंवर्धनाच्या कामात सिनेअभिनेता जितेंद्र जोशीने श्रमदान करून ग्रामस्थांचा उत्साह वाढवला. 

रविवारी सकाळीच अभिनेता जितेंद्र जोशी हा खुलताबाद तालुक्यात दाखल झाला आहे. तिसगाव तांडा, आखातवाडा , बोरवाडी खिर्डी या गावांमध्ये सुरू असलेल्या कामांना भेट देत श्रमदान केले. दरम्यान, त्याने पाणी फाउंडेशनच्या कामाविषयी चर्चा केली. आतापर्यंत करण्यात आलेल्या गावागावांतील जलसंधारणाची कामे पाहून समाधान व्यक्त केले. या वेळी उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, तहसीलदार डॉ. अरुण जऱ्हाड, पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक इरफान शेख, तालुका समन्वयक सुनील शिंदे, नितेश आदमाने, प्रशिक्षक विकास झाल्टे, पाणलोट सेवक पोपट मेंगाळ, सुभाष कचरे यांच्यासह सरपंच, सदस्य, ग्रामसेवक उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...