आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेके टॉवर्सच्या पाठीमागील पार्किंगच्या जागेवरचे अतिक्रमण अजूनही तसेच!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वाहनतळासाठी आरक्षित ठेवलेल्या जेके टॉवर्सच्या पाठीमागील पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांचा दावा न्यायालयाने फेटाळला. तरीही हे अतिक्रमण पाडण्यात मनपाचा अतिक्रमण विभाग टाळाटाळ करत असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी डीबी स्टारने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर मनपाचे अधिकारी पाहणी करून गेले. पण अद्यापही अतिक्रमण काढण्याची कारवाई मात्र झालेली नाही.
वाहनतळाच्या आरक्षित ठेवलेल्या जेके टॉवर्सच्या पाठीमागील पार्किंगच्या जागेत विनापरवाना बांधकाम करून एका निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याने कब्जा केला. आधी मुरमाचा भराव टाकून जागेचे सपाटीकरण केले. नंतर वाहनतळाचे प्रवेशद्वार पाडून कायमस्वरूपी सुरक्षा भिंत बांधत आणि साइड मार्जिनच्या जागेवर अंडरग्राउंड बांधकाम सुरू केले. याविरोधात अनेकदा तक्रारी झाल्या. मनपाने फक्त नोटिसांचा साेपस्कार पार पाडला. प्रकरण न्यायालयात गेले.
न्यायालयाने अतिक्रमणधारकांचा दावा फेटाळला. त्यानंतर २२ जुलै २०१६ रोजी विधि सल्लागार अॅड.राजेंद्र मुगदिया यांनी ही बाब विधी अधिकाऱ्यांना कळवली. विधी अधिकारी अपर्णा थेटे यांनी २७ जुलै २०१६ रोजी अतिक्रमणचे पदनिर्देशित अधिकारी महावीर पाटणी यांना कारवाईबाबत लेखी सूचना दिल्या. तसेच याची माहितीही उपायुक्त रवींद्र निकम यांना दिली होती. मात्र एवढे होऊनही अधिकारी कारवाई करण्याबाबत टाळाटाळ करत आहेत.

आमचे काम आम्ही केले
विधी सल्लागारांचे दावा खारिज झाल्याचे लेखी पत्र मिळाल्यानंतर अतिक्रमण विभागाला तातडीने कळवले होते. त्यानुसार त्यांनी तत्काळ कारवाई करणे गरजेचे होते. आमचे काम आम्ही केले. अपर्णाथेटे, विधीअधिकारी, मनपा

आयुक्तांनी आदेश दिले
विधी अधिकाऱ्यांनी अतिक्रमण विभागाला दिलेले पत्र आणि वेळोवेळी न्यायालयाने खारिज केलेले दावे आम्ही मनपा आयुक्तांना दाखवले. आता आयुक्तांनी आठवडाभरात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. लक्ष्मी नारायणअट्टल, तक्रारदार
विधी सल्लागारांच्या पत्रानंतरही अधिकाऱ्यांकडून कारवाई नाही
जेके टॉवर्स समोर पार्किंगची अपुरी सोय आहे. दुसरीकडे इमारतीमध्ये कामानिमित्त येणाऱ्यांची वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्यांची आणि ग्राहकांची वाहने रस्त्यावरच लागतात. मुख्य म्हणजे अत्यंत वर्दळीचा जालना रोडच्या रहदारीला फटका बसतो. शिवाय ही वाहने आसपास असलेल्या इतर व्यावसायिकांच्या प्रतिष्ठाणांसमोरही लावली जातात. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून जेके टॉवर्समधील व्यावसायिक त्रस्त आहेत.
यंत्रणा कधी होईल जागी?
याप्रकरणात उघड उघडपणे संबंधिताने अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले. मनपाच्या विधि अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटाव विभागाल तसे पत्रही दिले. पण तरीही कुठलीही कारवाई केली जात नाही. अधिकारी केवळ संबंधित जागेची पाहणी करतात आणि आता जणू कारवाई होणारच अशा आविर्भावात जातात. पण नंतर प्रत्यक्षात कारवाई मात्र होत नाही. त्यामुळे शहरभरात असे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कारण यंत्रणेला सहज हाताशी धरून वाटेल तसे वाकवता येते हा समज दृढ होत आहे.
बातम्या आणखी आहेत...