आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राचार्यच सिनेमाला जातात तेव्हा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर देशमुख हे काही प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसोबत सोमवारी ‘पोश्टर बॉइज’ सिनेमा पाहण्यासाठी एका मल्टिप्लेक्समध्ये दिसले.
तेव्हा सा-यांनाच आश्चर्य वाटले. पण या एकत्रित सिनेमावलोकनाचे कारणही तसेच होते. ‘पोश्टर बॉइज’चा दिग्दर्शक समीर पाटील हा जेएनईसीचा माजी विद्यार्थी. त्याच्या गाजत असलेल्या पहिल्या चित्रपटाचे कौतुक म्हणून यांत्रिकी अभियांत्रिकीचे विद्यार्थी शुभम राठी, सुरेश साळवे, गौरव पाटील, सुमित शिंदे, संकेत घुले आणि रिद्धी जोशी यांनी सिनेमाचा बेत जमवला होता. समीरबद्दल सा-यांच्याच मनात अभिमान आणि आनंद काठोकाठ वाहत होता.
अर्थात महाविद्यालयाच्या शिस्तीप्रमाणे कार्यालयीन वेळेनंतर सायंकाळी ७ वाजता या चित्रपटाचा सर्वांनी आस्वाद घेतला. 24 वर्षांपूर्वी महाविद्यालयात आपल्या नाटकांनी रंगमंच गाजवणा-या समीरची गगनभरारी सर्वांना सुखावून गेली. उपप्राचार्य हरिरंग शिंदे, डॉ. अभय कुलकर्णी, डॉ. आर. डी. कोकाटे, डॉ. रवी देशमुख प्रा. बी. एम. पाटील, प्रा. सुदर्शन धारूरकर, प्रा. गिरीश बसोले, प्रा. आरिफ पठाण आदींनी पोश्टर बॉइजचा आनंद घेतला.