आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेत नोकरभरती होणार ; 124 पदांसाठी 11000 अर्ज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद । गतवर्षी सर्वसाधारण सभागृहाने स्थगिती दिल्याने रखडलेली 124 पदांची नोकर भरती प्रक्रिया आता सुरू होणार आहे. यासाठी 11 हजारावर अर्ज आले असून त्याची छाननी करण्याचे सांगण्यात आले.
रिक्तपदांसाठी गतवर्षी अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी 11 हजार 500 अर्ज आले. पालिकेत दैनिक वेतनावर कार्यरत असलेल्या मजुरांनाच प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी करत सदस्यांनी या प्रक्रियेला विरोध करत स्थगिती दिली होती. तेव्हापासून भरती रखडली होती. आता ही प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय पदाधिकार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला.
वर्ग-4चीही भरती होणार : पालिकेत आणकी 267 पदे रिक्त असून त्यातील 200 पदे चतुर्थर्शेणीतील आहेत. या पदांचा यात समावेश नाही. वर्ग- 3चे 67 पदे रिक्त आहेत. यासाठी नंतर भरती होणार आहे.