आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावी ते पदवीधरांसाठी १३ कंपन्यांमध्ये संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जिल्हा रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने १० वी पास ते अभियांत्रिकी, एमबीए उत्तीर्णांसाठी १० जून रोजी विद्यापीठाच्या सभागृहात रोजगार मेळावा होईल, असे प्लेसमेंट अधिकारी गिरीश काळे, सहायक संचालक वि.का.भुसारे, विजय रिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मेळाव्यात स्थानिक कंपन्यांबरोबरच विप्रो, नेसेन्सी इन्फो टेक्नो,भारती एअरटेल यांसह एकूण १३ कंपन्या प्रशिक्षणार्थी, मार्केटिंग तसेच टीम मेंबर या पदांसाठी मुलाखती घेणार असून यशस्वितांच्या ३२६ पदांवर नियुक्त्या करण्यात येतील. १८ ते ३० या वयोगटातील इच्छुक मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. इच्छुकांनी www.maharojgar.gov.in या संकेतस्थळावरून एंट्री पास प्राप्त करून घ्यावे किंवा एम्प्लाॅयमेंट कार्ड असल्यास बायोडाटासह १० जून रोजी सकाळी १०.३० वा. विद्यापीठाच्या सभागृहात उपस्थित राहावे. कार्ड नसलेल्यांनी नोंदणी करून आपले एंट्री पास घ्यावेत. जिल्हा रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, मालजीपुरा, बाबा बसस्टँड रोड, येथेही नोंदणी करून एंट्री कार्ड घेण्याची व्यवस्था केली आहे.
‘टीसीएस’साठीउद्या कॅम्पस : विद्यापीठरोजगार कार्यालयातर्फे टीसीएस कंपनीच्या कॅम्पस मुलाखतीचे मंगळवारी (९ जून) सकाळी १० वाजता आयोजन करण्यात आले आहे. शैक्षणिक सत्र २०१५ मध्ये पदवीप्राप्त करणारे बीए, बीकॉम, बीएस्सीचे (संगणकशास्त्र सोडून इतर सर्व) विद्यार्थी या कॅम्पस मुलाखतीमध्ये भाग घेऊ शकतात. महाविद्यालयातील इच्छुक विद्यार्थ्यांची विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील लिंकवर नाव नोंदवावीत. अधिक माहितीसाठी विद्यापीठाचे प्लेसमेंट अधिकारी गिरीश काळे यांच्याशी ०२४०-२४०००५७ वर संपर्क साधावा.
सहभागी कंपन्यांची नावे
वस्तू सर्व्हिसेस अँड सोल्युशन, नेसेन्सी इन्फो टेक्नो, विप्रो लिमिटेड(स्विचेस विभाग), भारती एअरटेल, ज्योतिबा टेक्नॉलॉजीज, हरमन फिक्नो लिमिटेड, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक इग्नू यांचा ग्रुप, इंडुर हाऊझर फ्लोटक इंडिया, धूत ट्रान्समिशन, रुबीकॉन फॉर्मास्युटिकल्स, पर्किन्स इंडिया.
बातम्या आणखी आहेत...