आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकिंग, रेल्वे आणि बीएसएफमध्ये भरती, तरुणांना नोकरीची संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी आनंदाची वार्ता असून बँकिंग, रेल्वेसहित देशभरातील विविध सेक्टरच्या १ हजार १९५ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यात बीएसएफच्या ६२२ जागा भरण्यात येणार असून आयटीआय झालेल्या उमेदवारांना या संधी मिळू शकेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ एप्रिल असून वैद्यकीय चाचणीदेखील घेतली जाईल. अधिक माहितीसाठी उमेदवारांना www.bsf.nic.in या संकेतस्थळावर भेट देता येईल. पटना हायकोर्टात १७९ पदांकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत.
कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करण्यास पात्र असतील. लेखी परीक्षा आणि मुलाखत या पद्धतीने निवड प्रक्रिया होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ एप्रिल आहे. बँक ऑफ बडोदामध्ये २५० जागा स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ एप्रिल आहे. दक्षिण रेल्वे विभागात ट्रे अॅप्रेंटिसच्या १४४ जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्यासाठी २२ एप्रिल ही अंतिम तारीख असेल.