आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीच्या आमिषाने युवतीवर बलात्कार; पीडितेचे लग्न भोळसर भावाशी लावुन दिले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- नोकरीचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी युवकासह त्यास मदत करणाऱ्या सहा जणांविरुद्ध सोमवारी हर्सूल ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यात पीडितेच्या पतीचाही समावेश आहे. पीडिता एमएचे शिक्षण घेत असून हर्सूल भागात राहते. 
 
एकाच कॉलेजमध्ये असल्याने संशयित आरोपी जगदीश पंढरीनाथ हुंडे ( २६, रा. पिंपळगाव खंडाळा, ता. वैजापूर) याच्याशी तिचा परिचय झाला. शिकवणी वर्गात नोकरी लावून देतो, अशी थाप मारून त्याने पीडितेशी जवळीक वाढवली. 
 
२० फेब्रुवारी रोजी बहिणीच्या भानुदासनगर येथील घरात तीन दिवस डांबून ठेवत त्याने अत्याचार केला, असा आरोप पीडितेने केला आहे. त्यानंतर जगदीशने जालना येथील एका मंदिरात शुक्रवारी (२४ फेब्रुवारी) मोठा भाऊ शंकर ( ३१) याच्यासोबत पीडितेचे लग्न लावले. 
त्याचे आई-वडिलांसह अन्य नातेवाईकही त्या वेळी उपस्थित होते. शंकर भोळसर असून त्यालाही थाप मारत जगदीशने पीडितेला गंगापूर येथे नेऊन लॉजमध्ये तिच्यावर अत्याचार केला. 
 
पीडितेने स्वतःची सुटका करून घेत पोलिसांकडे धाव घेतली. दरम्यान, शंकर हुंडे यास ताब्यात घेतले असून मुख्य संशयित आरोपी जगदीशसह अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचे हर्सूल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वसीम हाश्मी यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...