आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैलास लेणीच्या माथ्यावर येळगंगेच्या पात्रात लपलेले जोगेश्वरी देवीचे मंदिर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कैलास लेणीच्या माथ्यावर समुद्रसपाटीपासून अकराशे फूट उंचीवर येळगंगा नदीचे उगमस्थान आहे. धबधब्याच्या रूपाने ही नदी वाहत खाली येते. लेणीपासून शंभर फूट उंचीवर गणेश लेणी आहेत. त्या बाजूला देवीची शिल्पे आणि रंगीत चित्रे असलेल्या लेणी आहेत. तेथे एका कपारीत जोगेश्वरी मातेची मूर्ती आहे. पाचशे वर्षांचा इतिहास असलेली ही देवी वेरूळसह पंचक्रोशीतील गावकऱ्यांनाही माहीत आहे. मात्र, पर्यटकांसह औरंगाबादच्या भाविकांना या देवी माहीत नाही.
वेरूळच्या कैलास लेणीच्या समोर उभे राहिल्यावर डाव्या बाजूने वर जाण्यासाठी पाऊलवाट लागते. तेथे सप्त मातृकांच्या रूपातील सात देवींची सुंदर शिल्प त्यांच्या वाहनांसह कोरलेल्या दिसतात. त्या पुढे गेले की झोपडीच्या आकारातील लेणी दिसतात. त्यांना गणेश लेणी जोगेश्वरी केव्हज म्हणतात. त्यावर घनदाट झाडी अााणि बारीक झुडपांचे जंगल लागते, ते पार केल्यास खडकाळ नदीचे विस्तीर्ण पात्र दृष्टीस पडते. एका कोपऱ्यात दीप माळ दिसते, तर समोर विहिरीसारखी सात कुंड आहेत. तेथे महादेवाची पिंडच तयार झाली असून तिला सतत नदी जलाभिषेक करत पुढे वाहते.

गावकऱ्यांनी या देवीला जोगेश्वरी असे नाव दिले असून तिची कुलदेवता म्हणून पूजा करतात. स्थानिक नागरिक वगळता पर्यटकांसह औरंगाबादच्या भाविकांनादेखील तिची माहिती नाही. मे महिना गावात ४० अंश तापमान होते, तर या ठिकाणाजवळ २४ अंश तापमान होते. या देवीचा इतिहास उपलब्ध नाही. मंदिराची नोंद नाही. गाइड मधुसूदन पाटील यांच्या मते मंदिराला पाचशे वर्षांचा इतिहास आहे. गावकऱ्यांनी ही देवी माहीत आहे. इतर कुणीही या ठिकाणी पोहोचलेले नाही.


पुस्तकात उल्लेख
औरंगाबादच्या लेखिका राधिका टिपरे यांना २००० मध्ये सांस्कृतिक विभागाच्या वतीने एक प्रोजेक्ट मिळाला. यात वेरूळमधील स्त्री पात्रांची वेशभूषा, केशभूषा यावर अभ्यास केला. त्या वेळी त्यांना देवी स्वप्नात दिसली. दुसऱ्या दिवशी त्यांनी गाइडच्या मदतीने शोध घेऊन त्या मंदिराची वाट शोधून काढत दर्शन घेतले. मी पुस्तकात या देवीची माहिती प्रसिद्ध केली आहे. वेरूळ लेणीचे अभ्यासक योगेश जोशी म्हणाले की, गावकऱ्यांनी ही देवी माहीत आहे. इतर कुणीही येथे पोहोचलेले नाही.
बातम्या आणखी आहेत...