आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jogeshwari Grampanchayat Get Iso Certificate Waluj Aurangabad

जोगेश्वरीला ‘आयएसओ’ : गंगापूर तालुक्यात मानांकन मिळवणारी दुसरी ग्रामपंचायत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - एमआयडीसी वाळूजला लागून असलेल्या पाच गावांची मिळून असलेल्या जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतीला ‘आयएसओ’ मानांकन समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते मंगळवारी (8 ऑक्टोबर) प्रदान करण्यात आले. त्यामुळे गंगापूर तालुक्यात ‘आयएसओ’ मानांकन मिळवणारी ही दुसरी ग्रामपंचायत ठरली आहे, तर या प्रमाणपत्रामुळे जबाबदारी वाढल्याची प्रतिक्रिया सरपंच योगेश दळवी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर हा सोहळा पार पडला. या वेळी आमदार प्रशांत बंब, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी ग्रामपंचायतीने राबवलेल्या उपक्रमांचा उल्लेख करून गौरव केला. पोलिस अधीक्षक इशू सिंधू, सभापती पूनम राजपूत, चंद्रभागाबाई गोल्हार, पोपट गाडेकर यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. प्रशांत जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश तुपे यांनी आभार मानले.

असे आहेत उपक्रम : वाळूज एमआयडीसीशेजारी जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायत असून त्यात कमलापूर, रामराई, नायगाव, जोगेश्वरी व रामराईवाडी अशी पाच गावे येतात. त्यांची एकत्रित मिळून सुमारे 15 हजार लोकसंख्या आहे. पर्यावरण ग्रामसमृद्ध योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीने पाचही गावांतील प्रत्येकाच्या घरासमोर विविध वृक्षांच्या रोपांची लागवड केली. ही रोपे आता बहरली आहेत. अंगणवाड्यांचा दर्शनी भाग, जिल्हा परिषदेच्या शाळा, विविध धार्मिक स्थळे व शासकीय मोकळ्या जागेत फळझाडांची लागवड करण्यात आली. या झाडांच्या संगोपनासाठी लोखंडी जाळ्यांची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे परिसरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होत आहे.

गावातील 10 व्यक्ती देवदर्शनाला : ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून खर्चाचा भार उचलून दर तीन महिन्यांनी 50 वर्षांपुढील वयोमानाच्या 10 ग्रामस्थांना देवदर्शनासाठी विविध ठिकाणी पाठवले जाणार आहे. त्यासाठी पाचही गावांतील ग्रामस्थांची निवड केली जाणार आहे.

गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी ग्रामनिधीतून दरवर्षी एक हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मजुरीने कामावर जाणार्‍या, मात्र गरोदरपणामुळे घरी बसलेल्या गरीब व गरजू महिलांना तीन महिन्यांच्या मजुरीची रक्कमही ग्रामपंचायतीकडून अनुदान स्वरूपात दिली जाते.

अंत्यविधीच्या खर्चाचा भार : ग्रामपंचायतीचा खातेदार व त्याने ग्रामपंचायतीचा सर्व कर भरलेला असेल, अशा ग्रामस्थांचे किंवा त्यांच्या नातलगांचे निधन झाल्यास त्यांच्या अंत्यविधीच्या सर्व खर्चाचा भार ग्रामपंचायत प्रशासन उचलते. हा उपक्रम 15 ऑगस्टपासून सुरू आहे. ग्रुप ग्रामपंचायतीच्या पाचही गावांतील 50 वर्षे वयाच्या पुढील ग्रामस्थांचा वाढदिवस ग्रामपंचायतीतर्फे साजरा केला जाणार आहे. संबंधिताला ग्रामपंचायतीकडून सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत लेखी निमंत्रणपत्र घरपोच पाठवण्यात येते. त्यानंतर त्या ग्रामस्थाचा ग्रामपंचायत कार्यालयात सत्क ार करण्यात येतो.

उपक्रम : ग्रामस्थांनी सध्या पाणंदमुक्तीचा वसा घेतला आहे. गावात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवले जात आहे. त्यासाठी जनजागृती सुरू आहे. गावातील सांडपाण्याच्या नियोजनासाठी ड्रेनेज लाइन टाकण्यात आली. पाचही गावांना एमआयडीसीचे पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध क रून देण्यात आले आहे.

गृहउद्योगांसाठी मदत : महिलांना लघु उद्योगासाठी प्रोत्साहन दिले जाते. महिला व बालकल्याण विभागातर्फे निधी दिला जातो. तसेच सांडपाण्याचे नियोजन झाल्याने रस्त्यांवर सांडपाणी दिसून येत नाही.