आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jogeshwari Group Grampachyat Issue At Waluj, Aurangabad

कमलापुरात ग्रामपंचायतम्‍ाध्‍ये कर भरणार्‍यांना मोफत दळण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- गंगापूर तालुक्यातील ‘आयएसओ’ नामांकनप्राप्त जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतीने वर्षभराचा कर भरणार्‍या ग्रामस्थांसाठी मोफत पिठाच्या गिरणीचा उपक्रम राबवला आहे. पिठाच्या गिरणीचा शुभारंभ सरपंच योगेशराव दळवी यांच्या हस्ते आसाराम बापूनगरात शुक्रवारी (17 जानेवारी) करण्यात आला. जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायत तालुक्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम ग्रामपंचायत मानली जाते.

रामराई, जोगेश्वरी, कमळापूर, नायगाव, रामराईवाडी अशा पाच गावांची मिळून जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायत आहे. ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत ग्रामपंचायतीतर्फे लोकोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. जे ग्रामस्थ ग्रामपंचायतीचा थकीत कर एकरकमी भरतील अशांसाठी ग्रामपंचायत प्रशासनाने मोफत दळण दळून देण्यासाठी पिठाची गिरणी सुरू केली आहे. उपसरपंच नजीरखाँ पठाण, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाघचौरे, ज्ञानेश्वर नीळ, संजय दुबिले, तुकाराम मिठे, हरिभाऊ काजळे, राजेंद्र सरोवर यांच्यासह ग्रामस्थांची या वेळी उपस्थिती होती.

ग्रामपंचायतीचे उपक्रम
पर्यावरण ग्रामसमृद्ध योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीने पाचही गावांतील प्रत्येकाच्या घरांसमोर तसेच अंगणवाड्यांचा दर्शनी भाग, जिल्हा परिषदेच्या शाळा, विविध धार्मिक स्थळे व शासकीय मोकळ्या जागेत फळझाडांची लागवड केली आहे. या झाडांच्या संगोपनासाठी लोखंडी जाळ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यास मोठी मदत होत आहे.

अंत्यविधीचा खर्चही ग्रामपंचायतीकडे
दर तीन महिन्यांना 50 वर्षांवरील 10 ग्रामस्थांना ग्रामपंचायततर्फे देवदर्शनाला पाठवले जाणार आहे. मात्र हे ग्रामस्थ ग्रामपंचायतीचे करदाते असावेत. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ग्रामनिधीतून दरवर्षी हजार रुपयांची मदत दिली जाते. गरोदरपणामुळे घरी बसलेल्या गरीब व गरजू महिलांना तीन महिन्यांच्या मजुरीची रक्कमही ग्रामपंचायतीकडून अनुदान स्वरूपात दिली जाते. ग्रामपंचायतीचा सर्व कर भरलेला असेल अशा ग्रामस्थांचे किंवा त्यांच्या नातलगांचे निधन झाल्यास त्यांच्या अंत्यविधीचा खर्च ग्रामपंचायत प्रशासन उचलते.

26 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर
ग्रामनिधीतून सुमारे 9 लाख रुपये खर्चून जोगेश्वरी, कमळापूर, रामराई, नायगाव व रामराईवाडीत 26 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. हे सर्व कॅमेरे ग्रामपंचायत क ार्यालयातून ऑपरेट केले जातात. त्यामुळे गावातील गैरप्रकारांना पायबंद बसत आहे. गावातून बाहेर पडण्यासाठी मॉडेल रस्त्याचे काम करण्यात आले. या रस्त्याला अडथळा ठरणारी अनेक अतिक्रमणे ग्रामस्थांनी स्वत: क ाढली. ज्यांनी वर्षभराचा कर आगाऊ भरला त्यांना करात 10 टक्के सूट दिली जात आहे. शिवाय त्यांचा ग्रामपंचायतीकडून भेटवस्तू देऊन सत्कारही केला जातो.

ग्रामस्थांचा वाढदिवस साजरा
पाचही गावांतील 50 वर्षांपुढील ग्रामस्थांचा वाढदिवस ग्रामपंचायतीतर्फे साजरा केला जाणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात स्वतंत्र कक्ष उघडण्यात आला आहे. त्यात ग्रामस्थांच्या वाढदिवसाच्या तारखांच्या नोंदी आहेत. वाढदिवसाचे लेखी निमंत्रणपत्र घरपोच पाठवण्यात येते. या उपक्रमास महात्मा गांधी जयंती दिनापासून प्रारंभ झाला आहे.

महिलांना गृह उद्योगासाठी मदत
ग्रामपंचायत प्रशासनाच्या महिला व बालकल्याण निधीतून महिलांना आर्थिक मदत दिली जात आहे. पापड तयार करणे, पिको मशीन, शिवणकाम आदी कामे करून महिला स्वावलंबी होत आहेत. पाचही गावांत सांडपाण्याच्या नियोजनासाठी ड्रेनेजलाइन टाकली आहे. त्यामुळे कुठेही रस्त्यावर सांडपाणी दिसत नाही. परदेसवाडी तलावाकाठी ग्रामपंचायतीच्या तीन पाणीपुरवठा विहिरी आहेत. त्यांना पाणीही मुबलक आहे. मात्र, वाळूज एमआयडीसीतील क ारखान्यांतील दूषित पाण्यामुळे विहिरींचे पाणीही दूषित झाले आहे. परिणामी दररोज साडेसात लाख लिटर पाणी औद्योगिक विकास महामंडळाकडून घेऊन त्याचा पुरवठा सुरू आहे.