आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वस्थ भारत मोहिमेत सहभागी व्हा : बट्टर, प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांना केले सन्मानित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रुग्ण सहायक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करताना स्टरलाइट कंपनीतील मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख शिविंदर बट्टर. - Divya Marathi
रुग्ण सहायक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करताना स्टरलाइट कंपनीतील मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख शिविंदर बट्टर.
औरंगाबाद- प्रत्येकाने आपल्या आरोग्याविषयी जागरूक राहणे आवश्यक आहे; परंतु योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळाल्याने समज आणि गैरसमज निर्माण होतात. विशेषत: ग्रामीण भागात आरोग्याच्या समस्या जास्त आहेत. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास निरोगी आयुष्य जगण्यास मदत होईल. तेव्हा या अभ्यासक्रमाचा उपयोग स्वस्थ भारत मोहिमेसाठी करावा, असे आवाहन स्टरलाइट कंपनीतील मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख शिविंदर बट्टर यांनी केले.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठांतर्गत डॉ. हेडगेवार रुग्णालय आणि सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक वर्षाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या दोन बॅचमधील विद्यार्थ्यांना शुक्रवारी प्रमाणपत्रांचे वितरण बट्टर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पूर्वा प्रफुल्ल, मैत्रेयी चितळे, अवध गुप्ता, गणेश मते, डॉ. प्रतिभा फाटक, सुहास आजगावकर, सोनाली डोंगरसाने, गोविंद फड, प्रज्ञा मोरे, स्नेहल देशमुख, आशा कसबे यांची उपस्थिती होती.

बट्टर म्हणाले, आज विविध क्षेत्रांत अनेक संधी उपलब्ध आहेत. तुम्ही निवडलेले रुग्ण सहायक हे क्षेत्र सेवा करणारे आहे. रग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. अभ्यासक्रमात शिकवलेल्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग समाजातील तळागाळातील व्यक्तीला सहकार्य करण्यासाठी करा; परंतु आर्थिक अडचणी आहेत म्हणून अर्धवट शिक्षण सोडू नका. स्वत:च्या आणि इतरांच्या विकासासाठीही शिक्षणाची कास धरा, असेही बट्टर म्हणाले. स्टरलाइटच्या वतीने विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य या प्रशिक्षणासाठी करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. मान्यवरांच्या हस्ते ३२ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. फाटक यांनी सूत्रसंचालन केले. आभार आजगावकर यांनी मानले.