आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकार मुकरम शेख यांचा मृत्यू गळफासानेच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- बालानगर येथील पत्रकार मुकरम शेख यांनी गळफास घेऊनच आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी शवविच्छेदन अहवालाच्या आधारे सांगितले.  चिठ्ठीतील अक्षर शेख यांचेच असल्याची खात्री नातेवाइकांकडून करण्यात आल्याचेही  सपोनि ज्ञानेश्वर पायघन यांनी सांगितले.
 
शेख यांनी आपण आत्महत्या करत असून माझ्या धर्मात आत्महत्या हा गुन्हा असला तरी तो मी केला, असा उल्लेख असून या तीनपानी चिठ्ठीतील अक्षर हे त्यांच्या घरातील व्यक्तींसह मित्र व इतर काही पत्रकारांना पोलिसांनी दाखविले. ते अक्षर शेख यांचेच असल्याचा दावा पोलिस व नातलगांनी केला असून यात शंका असली तरी त्याची चौकशी करण्यात येईल, असे पायघन यांनी सांगितले. तणावाची परिस्थिती पाहता गावात बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
 
हेही वाचा,