आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Journalist Pension Scheme In Process Says Cm Fadanvis In Aurangabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्रकारांच्या पेन्शन योजनेचा सकारात्मक विचार - मुख्यमंत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पत्रकारांनापुरस्कार देण्यात मागच्या सरकारने हात आखडता घेतला. मात्र, आम्ही सत्तेत येताच सरकार गतिमान झाले आहे. त्यामुळेच मागील तीन वर्षांपासून रखडलेले उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार तातडीने मंजूर करण्यात आले. राज्य शासनाच्या वतीने पत्रकारांसाठी दरवर्षी आयोजित होणारा सत्कार सोहळा पुढील वर्षापासून महाेत्सव म्हणून साजरा केला जाईल, अशी घाेषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. तसेच पत्रकारांसाठी पेन्शन याेजना सुरू करण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

राज्य सरकारतर्फे उत्कृष्ट पत्रकारितेसाठी दिल्या जाणार्‍या पुरस्कारांचे बुधवारी मुंबईतील एका कार्यक्रमात वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात ज्येष्ठ संपादक लक्ष्मण जोशी, विजय कुवळेकर आणि दिनकर रायकर यांना लोकमान्य टिळक जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, तर ‘दिव्य मराठी’चे रवी गाडेकर (औरंगाबाद), महंमद युसूफ शेख
(सोलापूर), नवनाथ दिघे (शिर्डी) सतीश भटकर (अमरावती) यांचाही उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, माहिती विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर- पाटणकर, महासंचालक चंद्रशेखर ओक, संचालक शिवाजी मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

विविध प्रश्नांना वाचा फोडणार्‍या पत्रकारांची सामाजिक सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने राज्य शासनाने पावले उचलली असून पत्रकारांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. त्याचबरोबर पुढील वर्षासाठीच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांमध्ये ई-माध्यमांसाठी स्वतंत्र पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली.

(फोटो : ‘दिव्य मराठी’चे औरंगाबाद येथील पत्रकार रवी गाडेकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.)