आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेपी ग्रुपकडून २५ लाखांची देणगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी म्हणून एमजीएम संचालित जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेल्या एक उद्योजक जोडप्याने तब्बल २५ लाख रुपयांचा निधी महाविद्यालयाला दिला आहे. जेपी ग्रुपचे सुरेन जैन आणि अंजली जैन अशी त्यांची ओळख आहे.

हुशार असूनही गरिबीमुळे शिकता येत नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून एक कोश (निधी) उभारण्याची इच्छा होती. हा कोश आपण शिक्षण घेतलेल्या महाविद्यालयातच उभारला जावा, असे वाटल्याने ही रक्कम दिली आहे. त्यातून जेएनईसी काॅर्प्स फंड उभा राहणार आहे. या निधीत इतरही माजी विद्यार्थ्यांनी भर घालावी, अशी अपेक्षा आहे, असे सुरेन जैन पत्रकारांना म्हणाले.

आज विविध क्षेत्रांत मोठे बदल होत आहेत. आम्ही महाविद्यालयात असताना इतक्या सुविधा नव्हत्या; परंतु शिक्षकांनी कधीच त्या गोष्टींची उणीव भासू दिली नाही. अत्याधुनिक सुविधा असतानाही अनेकांना आर्थिक अडचणी येतात. त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागते. असे कुणाच्याही बाबतीत घडू नये यासाठी हा फंड उभारला जात आहे. या निधीतून किती विद्यार्थ्यांना मदत करायची हा निर्णय महाविद्यालयातर्फे घेतला जाईल, असेही जैन यांनी सांगितले. या वेळी प्राचार्य डॉ. सुधीर देशमुख, डॉ. अभय कुलकर्णी, रणजित कक्कड, डॉ. आर.आर.देशमुख यांचीही उपस्थिती होती.