आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जीटीएलने महावितरणाकडे भरली 156 कोटींची थकबाकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जीटीएल कंपनीने एकरकमी महावितरणची 156 कोटी रुपयांची थकबाकी अदा केली. मुंबईतील महावितरणच्या मुख्य कार्यालयात दोन्ही कंपन्यांच्या अधिकार्‍यांची बैठक झाली. जीटीएलने थकबाकीचा धनादेश महावितरणकडे सुपूर्द केला.

जीटीएल कंपनीची 109 कोटी रुपयांची बँक गॅरंटी महावितरणकडे ठेवण्यात आली आहे. जीटीएलने विविध पायाभूत सुविधांसाठी केलेला खर्च महावितरणकडे प्रलंबित आहे. शहरातील 2 लाख 45 हजार 689 वीज ग्राहकांकडून वीज बिलांच्या देयकापोटी 90 कोटी रुपये अपेक्षित असतात. मात्र, ग्राहक वेळेवर बिल भरत नसल्यामुळे जीटीएलला 18 कोटींचे नुकसान सोसावे लागत आहे. 28 मे 2012 रोजी कंपनीने 135 कोटी 67 लाख रुपये, 22 एप्रिल 2013 रोजी 3 कोटी 50 लाख रुपये आणि आता 156 कोटींची थकबाकी भरली आहे. वीजचोरी आणि वीज बिलाची वसुली हे मोठे आव्हान जीटीएलसमोर आहे. वीज बिलाची पूर्तता करावी आणि वीज चोरीसारख्या अपप्रवृत्तीला टाळण्यासाठी जीटीएलला सहकार्य करावे, असे आवाहन स्थानिक प्रमुख जगदीश चेलारामानी यांनी केले आहे.