आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला 1 वर्षे कारावास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अल्पवयीन मुलीवर शेतात बलात्कार करणा-यास न्यायालयाने 9 वर्षे सक्तमजुरी आणि साडेचार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
दोन वर्षांच्या सुनावणीनंतर शनिवारी (27 सप्टेंबर) जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिला. पोलिस आयुक्तालयामार्फत नेमलेल्या पैरवी अधिकाऱ्यांमुळे आरोपीला शिक्षा मिळाली. पप्पू परसराम नरवडे असे त्याचे नाव असून हर्सूल मध्यवर्ती कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे.
गंगापूर तालुक्यातील वरझडी येथील रहिवासी पप्पू याने 7 ऑक्टोबर 2012 रोजी दुपारी जांभाळा शिवारात काड्या गोळा करण्यासाठी आलेल्या १४ वर्षीय मुलीला एकटी पाहून अडवले. पण मुलीने तेथून पळ काढला होता. पाठलाग करत त्याने मुलीला जवळच्या कापसाच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. मात्र तिने आरडाओरडा केल्याने शेतात काम करीत असलेले पीडित मुलीचे काका, काकू आणि वडील घटनास्थळी धावले. तोपर्यंत आरोपीने पळ काढला, मात्र मुलीच्या फिर्यादीवरून छावणी पोलिस ठाण्यात त्यावेळी बलात्कार व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिस उपनिरीक्षक संतोष जाधव यांनी गतीने तपास करत घटनास्थळावरून पुरावे गोळा केले होते.पोलिस आयुक्तालयातर्फे नेमलेले पैरवी अधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक गजानन तडसे यांनी सरकारी अभियोक्तांना वेळोवेळी सहकार्य केले. गुन्हे शाखेचे जमादार द्वारकादास भांगे यांनी विविध मुद्यांवर पैरवी अधिकाऱ्यांना माहिती दिली. अतिरिक्त लोकअभियोक्ता एस. एम. रिझवी यांनी न्यायालयात सरकार पक्षाची बाजू मांडली. अखेर शनिवारी आरोपीला बलात्काराच्या आरोपाखाली 7 वर्षे शिक्षा व दोन हजार दंड, दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांची शिक्षा. जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली 2 वर्षे शिक्षा, दोन हजार दंड आणि स्थानबद्ध केल्याच्या गुन्ह्याखाली 1 महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.