आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कनिष्ठ महाविद्यालयांना मिळाला स्वतंत्र दर्जा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कनिष्ठ महाविद्यालयांना स्वतंत्र दर्जा देण्याची अट मान्य झाली आहे. यामुळे राज्यस्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन उपप्राचार्य पर्यवेक्षक संघटनेच्या वारंवार होणा-या मागणीस यश आले आहे, अशी माहित देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य चंद्रकांत गायकवाड यांनी दिली.
गायकवाड यांनी सांगितले की, स्वतंत्र दर्जासह स्वतंत्र प्राचार्य, पर्यवेक्षक देण्याची मागणी आम्ही केली होती. माध्यमिक शाळांपासून उच्च माध्यमिक विभाग आणि वरिष्ठ महाविद्यालयांपासूनही हा विभाग वेगळा करण्याची मागणी अमलात आणण्यासाठी अभ्यास समिती नियुक्त करण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे. शालेय शिक्षण सचिव अश्विनी भिडे तसेच जुक्टाचे प्रा. अनिल देशमुख,संजय शिंदे, डॉ. अविनाश बोर्डे यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले.