आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रमामुळे कल्पनाविष्काराला मिळाले पंख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दररोज सकाळी घरी येणारे वृत्तपत्र प्रकाशित कसे होते, इतक्या बातम्या कशा आणि कुठून येतात, याचे कुतूहल आमच्या मनात नेहमीच असायचे. ज्युनियर एडिटरच्या निमित्ताने आम्हीदेखील वृत्तपत्राचा एक भाग होऊ शकलो. आमच्या कल्पनांना आकार देऊ शकलो. या उपक्रमामुळे आम्हाला खूप प्रोत्साहन मिळाले आहे. आमच्या कल्पनाविष्कारांना नवे पंख मिळाले,अशी भावना पारितोषिक वितरणप्रसंगी विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केली.

'दिव्य मराठी'च्या वतीने राष्ट्रीय स्तरावर एप्रिलमध्ये ज्युनियर एडिटर स्पर्धा घेण्यात आली होती. औरंगाबाद विभागाचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवार, २६ ऑक्टोबर रोजी alt147दिव्य मराठी'च्या कार्यालयात घेण्यात आला. विजेत्या विद्यार्थ्यांना निवासी संपादक दीपक पटवे यांच्या हस्ते पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हा उपक्रम 'दिव्य मराठी'च्या सेल्स आणि मार्केट डेव्हलपमेंट विभागाकडून राबवण्यात आला होता. स्टेट ऑपरेशन हेड राकेश चतुर्वेदी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. उपक्रम यशस्वितेसाठी असिस्टंट मॅनेजर अनुष्का टिळक यांनी परिश्रम घेतले.

आनंद द्विगुणित झाला
मी एक ज्युनियर एडिटर आहे याचा आनंद होतोय. पारितोषिकामुळे आनंद द्विगुणित झाला आहे. या उपक्रमामुळे बऱ्याच नवीन गोष्टी मी समजू शकले. वैभवी धोंगडे, विद्यार्थिनी

अशी आहेत विजेत्यांची नावे
इशानी पटेल, अमोल भडुंगे, रूपाली निकम, संस्कार गुप्ता, यशराज जाधव, ऋषिकेश सोनवणे, साक्षी शेळके, किरण म्हेत्रे, गणेश काथार, सायली राऊत, शिवानी वाहूळ, वैभवी धोंगडे.

प्रेरणा देणारा उपक्रम
^या उपक्रमामुळेविद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले आहे.आमच्या शेंदुरवादा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी यात सहभागी झाले होते. दररोज वृत्तपत्र वाचतो.आपण यात लेखन करू शकतो याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे उत्साह देणारे आहे. श्रीपाद कुलकर्णी, शिक्षक

खूप छान वाटले
मला पारितोषिक मिळाले याचा आनंद आहेच, उपक्रमात सहभागी झाल्यामुळे मला वृत्तपत्राचा एक भाग होता आले. एक वाचक म्हणून तर मी आहेच, पण स्वत: वृत्तपत्र तयार करणेदेखील वेगळा अनुभव होता. शिवानी वाहूळ, विद्यार्थिनी

ज्युनियर एडिटर स्पर्धा पारितोषिक वितरणप्रसंगी विद्यार्थ्यांसोबत 'दिव्य मराठी'चे निवासी संपादक दीपक पटवे, असिस्टंट मॅनेजर अनुष्का टिळक यांची उपस्थिती होती.
बातम्या आणखी आहेत...