आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्युनियर शास्त्रज्ञाचे Innovation आगळावेगळा लॅपटॉप, बॅटरीवर चालणारी स्कूटर अन् बरेच काही...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वय वर्षे अवघे सोळा, पण सतत नवे काहीतरी करण्याचा त्याचा ध्यास. कोणतेही इलेक्ट्रॉनिक सर्किट लीलया तयार करण्याचे त्याचे कसब अफलातून अाहे. मनात आले की काही दिवसांत जोडणी करून मोबाइल, लॅपटॉप, बॅटरीवर चालणारी स्कूटर तयार करणाऱ्या या ज्युनियर शास्त्रज्ञाचे नाव आहे साहस चितलांगे.
सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयात बारावीत शिकणाऱ्या साहसने वयाच्या सातव्या वर्षी इलेक्ट्रॉनिक धबधबा घरीच तयार केला होता. शाळेत त्याचे खूप कौतुक झाले. तेव्हापासून त्याला या विषयातील गोडी वाढतच गेली. अभ्यास सांभाळून त्याने घरातील टाकाऊ वस्तूंपासून चक्क लॅपटॉप, फक्त १६ हजार रुपयांत दुचाकी मोपेड, मातीच्या कुंड्यांचे अनोखे फ्रिज तयार केले आहे. एवढेच नव्हे, मिनी बायोगॅस, मोबाइल, रॉकेट लाँचरही त्याने तयार केले आहे.
नारळाची करवंटी ठरली जगात दुसरी...
इंटरनेटवर जगभरात विज्ञानाच्या स्पर्धेत साहस सतत सहभागी होत असतो. होममेड माइक अशी जागतिक दर्जाची स्पर्धा होती. जगभरातील लाखो विद्यार्थ्यांनी घरातील साहित्य वापरून माइक तयार केले व अमेरिकेत पाठवले. साहसने नारळाच्या करवंटीवर चहाची गाळणी लावून अनोखा माइक तयार केला. त्याला जागतिक स्पर्धेत दुसरे बक्षीस मिळाले.
बातम्या आणखी आहेत...