आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...आणि लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच दागिने घेऊन झाली गायब नवविवाहिता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- लग्न होऊन काहीच दिवस झाले असताना नवविवाहिता दागिन्यांसह घर सोडून गेल्याचा प्रकार जवाहरनगर परिसरात घडला आहे. याप्रकरणी मुलाच्या आईने एप्रिल रोजी विवाहितेच्या नातेवाइकांच्या विरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

२४ डिसेंबर २०१५ रोजी हा विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच ती घर सोडून निघून गेली. सोबत लाख ३६ हजार रुपयांचे दागिने घेऊन गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी जयश्री प्रकाश क्षीरसागर (५५, रा. शास्त्रीनगर, वैजापूर) यांच्या फिर्यादीवरून काकाजी यमाजी खाडे (रा. कंडारी जालना), शारदा टाकळकर, महेश टाकळकर, शुभांगी टाकळकर (रा. शिवशंकर कॉलनी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. 
बातम्या आणखी आहेत...