आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्योती नायर खून प्रकरण: करमाड पोलिसांनी राजूला ठोकल्या बेड्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाड- ज्योती नायरच्या खुनी संशयिताला करमाड पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. दोघांपैकी एकाला पकडण्यात करमाड पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले आहे. राजू ऊर्फ लहू शामराव राठोड असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. राजूने शनिवारी दिवसभर तोंड उघडले नसल्याने तपासात अडथळे येत आहेत. या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की,औरंगाबाद- जालना महामार्गावर गाडे जळगाव फाट्यावर ज्योती रेस्टॉरंट नावाचे हॉटेल आहे. हे हॉटेल ज्योती नायर ही महिला चालवित होती. ज्योती मनोज नायर (४५) या महिलेचा जुलै २०१७ रोजी सकाळी च्या सुमारास धारदार सुऱ्याने गळा कापण्यात आला होता. ज्योती नायरचा खून झाल्यानंतर हॉटेलमध्ये काम करणारे राजू बालाजी हे दोन कर्मचारी सामानासह गायब झाले होते. राजू हा बिडकीनचा तर बालाजीचा पत्ता माहीत नसल्याचे तेथील कर्मचारी सांगत होते. पूर्ण पत्ता माहीत नसल्याने खुन्याचा शोध घेणे करमाड पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. या दोन कर्मचाऱ्यांना शोधण्यासाठी करमाड पोलिसांचे एक पथक हैदराबाद शिर्डीला जाऊन आले होते. परंतु तपास कामात त्यांना अपयश आले होते. 

करमाड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस.डी.पवार,सहायक फौजदार ढवळसिंग महेर,पोका. एम.जी.पारवे, डी.जे.बेले या पोलिस चमूने ज्योती नायरच्या खुन्याला पकडण्यासाठी चंगच बांधला होता. मोबाइल लोकेशनवरून राजू हा शिर्डी येथे असल्याची माहिती करमाड पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच करमाड पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क करून शिर्डी गाठले शुक्रवारी (दि.१८) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास राजू या आरोपीस बेड्या ठोकल्या. राजू या संशयितास पुढील तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे. राजू याच्याकडून पोलिस सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असून अजून तरी त्याने तोंड उघडलेले नाही. राजूने तोंड उघडताच दुसरा आरोपी बालाजी यास पकडण्यासाठी पोलिसांना सोपे जाणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...