आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कब-बुलबुल उत्सव २३ फेब्रुवारीपासून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भारत स्काउट्स, गाइड्स जिल्हा संस्था आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार (२३ फेब्रुवारी) पासून औरंगाबाद भारत स्काउट्स आणि गाइड्स जिल्हा कार्यालयात कब-बुलबुल उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही स्काउट्स आणि गाइड्सच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने कब-बुलबुल उत्सव होत असून यात बनी टमटोला व कब-बुलबुल सांस्कृतिक कार्यक्रम, मैदानी खेळ स्पर्धा आणि बक्षीस वितरण आदी कार्यक्रम घेण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी १० वाजता जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी नितीन उपासनी यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत स्काउट, गाइड्स जिल्हा संस्थेचे अध्यक्ष ज्ञानोबा मुंढे राहणार आहेत. तसेच प्रमोद सुमंत, शुभांगी तेंडोलकर,इस्कॉन अन्नामृतचे शाखा व्यवस्थापक सुदर्शन पोटभरे, ज्येष्ठ पत्रकार अलोक शर्मा उपस्थित राहतील.
त्यानंतर दुपारी ४.३० वाजता समारोपात विविध स्पर्धांतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण केले जाईल. शाळेतील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष ज्ञानोबा मुंढे, जिल्हा मुख्य आयुक्त भगवान सोनवणे, जिल्हा चिटणीस त्रिंबक करडेल, सहचिटणीस वैशाली आठवले, रामेश्वर पवार, मिलिंद तायडे, जिल्हा संघटन आयुक्त शीतल शिंदे यांनी केले आहे.