आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेतील फेरबदल पडणार लांबणीवर, कदम- खैरे संघर्षाचा परिणाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पालकमंत्री रामदास कदम आणि खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील संघर्षामुळे औरंगाबादेतील शिवसेनेतील फेरबदल लांबणीवर पडल्याचे चित्र आहे. राजेंद्र जंजाळ यांना सभागृह नेतेपदी मुदतवाढ देण्यास विरोध करूनही उपयोग नसल्याचे समोर आल्यावर खैरेंना तूर्तास माघार घ्यावी लागल्याचे दिसते. शहरातील सेनेचे प्रमुख पदाधिकारी बदलण्याचा खैरे यांचा आग्रहही बाजूला ठेवण्यात अाला आहे.

मनपा निवडणूक झाल्यापासून सेनेतील फेरबदलाची चर्चा सुरू आहे. त्यात आपलाही वरचष्मा राहावा यासाठी नेतेमंडळी प्रयत्नरत आहेत. त्यातही शिवसेनेत स्थानिक पातळीवर झालेली कोंडी कमी झालेली पकड यामुळे पक्षातील विद्यमान पदाधिकाऱ्यांपैकी काहींना हटवण्याची भूमिका खासदार खैरे यांनी घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सभागृह नेता दरवर्षी बदलण्याचा पायंडा शिवसेनेचा आहे. या वेळी पालकमंत्री कदम यांचे निष्ठावंत थेट आदित्य ठाकरे यांच्या संपर्कातील जंजाळ यांना सभागृह नेतेपद देण्यात आले. तेव्हापासून खैरे यांच्या टार्गेटवर आलेल्या जंजाळ यांना विरोध होत आहे. तिकडे पालकमंत्र्यांना शहरातील पक्ष संघटनेवरील खासदार खैरे यांची पकड कमी करायची असून त्यांनी खैरे यांच्या बहुतांश सूचनांकडे कानाडोळा केल्याचे समजते. त्यामुळे जंजाळ यांचे सभागृह नेतेपद कायम आहे. दरम्यान, शहराच्या कार्यकारिणीतील फेरबदलही लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

ओझा यांचे पुनर्वसन?
दरम्यान, माजी महापौर कला ओझा या वर्षभरापासून पक्षीय स्तरावर दुर्लक्षित असल्यासारख्याच आहेत. त्यांनी मुख्य प्रवाहात येण्यासाठी खासदार खैरे यांच्यासह इतर मोजक्या नेत्यांच्या माध्यमातून महिला आघाडीचे जिल्हा संघटकपद मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांची या पदावर निवड केली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...