आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सतीश चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला प्रायव्हेट लिमिटेड केले; कदीर मौलाना यांचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राष्ट्रवादीत कंत्राटदारांची चलती असून आमदार सतीश चव्हाण यांनी मराठवाड्यात पक्षाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. मौलाना यांनी पदाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची घोषणा करून राज्यात राष्ट्रवादीला पाडण्याचे आवाहन केले.
मराठवाड्यात चव्हाण विदर्भात आमदार संदीप बाजोरिया हे कंत्राटदार पक्ष चालवत असल्याचे सांगून, वरिष्ठ पातळीवरून अजित पवार त्यांचे सारथ्य करत असल्याचे ते म्हणाले. मध्यची उमेदवारी देतो म्हणून शेवटपर्यंत आशेवर ठेवले रात्रीतून पाठीत खंजीर खुपसला. २००९ च्या विधानसभेत आमदार चव्हाण यांनीच आपला पराभव केल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात राष्ट्रवादीला पाडा म्हणून आपण मुस्लिम समाजाच्या माध्यमातून संदेश देत असल्याचे मौलाना म्हणाले. उमेदवारीचे आश्वासन मिळाल्यानंतर १८ सप्टेंबरला शहरात फटाके फोडले. पण ऐनवेळी अजित पवार चव्हाण यांनी पाटील यांना एबी फॉर्म दिल्याचे ते म्हणाले. आपणाऐवजी दुसऱ्या मुस्लिम उमेदवारास मध्यमधून उमेदवारी दिली असती तर समजू शकले असते. पण विनोद पाटील यांच्यासारख्या नवख्या उमेदवारास कशी काय संधी मिळाली, असा प्रश्नही या वेळी त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, यासंदर्भात आमदार सतीश चव्हाण यांच्याशी रात्री उशिरापर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाइल बंद येत होता.

शहरात४० सिटी बस सुरू आहेत. प्रवासी बसत नसल्याने विस्तार थांबला. प्रवाशांची मागणी असेल, तर बससेवेचा विस्तार करू. यामध्ये सुधारणा करण्यासाठी आम्हाला प्रवाशांच्या सहभागाची गरज आहे. संजयसुपेकर, विभागीयनियंत्रक, म. रा. प. महामंडळ.
अजितदादा हुकूमशहा
राष्ट्रवादीचेमराठा पुढारी आपणाला गुलामासारखी वागणूक देत असत, तर पक्षात अजित पवार हुकूमशहा असल्याची टीका मौलाना यांनी केली. केवळ मुस्लिम, दलित बहुजन समाजाचे नाव घेण्यापुरतेच राष्ट्रवादी काम करते. प्रत्यक्षात देण्याची वेळ आली की नियोजनबद्धरीत्या टाळले जात असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी म्हणजे मराठा समाजाचा आरएसएस असल्याचे सांगत राष्ट्रवादीला पाडून काँग्रेसला मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी सुरजितसिंग खुंगर, इसा कुरेशी नवाब पटेल उपस्थित होते.