आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप सरकारला कर्जमाफी द्यायचीच नाही, माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांची टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री- कर्जमाफीला एवढ्या अटीशर्ती घालत असल्याचे कारण म्हणजे भाजप सरकार मुळात शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचीच नाही, असे प्रतिपादन माजी आ. डॉ. कल्याण काळे यांनी केले. फुलंब्री येथील बाजार समिती आवारात आयोजित कार्यक्रमात ते बुधवारी बाेलत होते.

फुलंब्री येथील कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या वतीने फुलंब्री विधानसभेचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सोहळ्यासह वृक्ष लागवड व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी देवगिरी कारखान्याचे चेअरमन जगन्नाथ काळे, फुलंब्री बाजार समिती सभापती संदीप बोरसे, औरंगाबाद बाजार समितीचे सभापती संजय औताडे, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र ठोंबरे, जिल्हा परिषद सदस्य किशोर बलांडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुदाम मते, उपसभापती राहुल डकले, अजगर पटेल उपस्थित होते. म्हणाले की, खऱ्या अर्थाने शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी हा सततच्या नापिकीने व पीक आलेच तर योग्य भाव मिळत नसल्याने आणखीच अडचणीत सापडत आहे. फुलंब्री तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेतून २०४४५ शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेले आहे. त्यामध्ये १९६७  शेतकरीच अटीशर्तीत बसतात. 
 
या वेळी कचरू मैंद, अशपाक पटेल, प्रभाकर सोटम, आनंदा ढोके, रऊफ कुरेशी, मधुशेठ खामगावकर, लहू मनकापे, संतोष मेटे, विजय मोरे, सिद्धेश्वर भागवत, रज्जाक शेठ,  अाबाराव सोनवणे, चंद्रकांत जाधव, इफ्तेखार सय्यद, कैसर पटेल, गणेश क्षीरसागर, गणेश पवार, गंगाधर मुळे, मुद्दसर पटेल, सहनिबंधक परमेश्वर वरखडे, मनोज गोरे आदी उपस्थित होते.