आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहितचा मार्ग चुकला; त्याचे राजकारण नको, \'डिक्की\'चे कांबळे यांचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- रोहित वेमुलाच्या आत्महत्येवरून देशभर तीव्र प्रतिक्रिया आहे. त्याचे कुटुंबीय व आंदोलकांना भेटण्यासाठी राजकारण्यांची रीघ लागली आहे. यापैकी ५% लोक जरी रोहित आंदोलन करत असताना भेटले असते तर त्याचा जीव वाचला असता, असे मत प्रसिद्ध उद्योजक व दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (डिक्की) चेअरमन मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय परिषदेनिमित्त अाैरंगाबादेत अालेल्या कांबळे यांनी ‘दिव्य मराठी’शी संवाद साधला. ते म्हणाले, रोहितच्या आत्महत्येवरून सुरू असलेले राजकारण थांबले पाहिजे. राहुल गांधी यांनी आंदोलकांची घेतलेली भेटही नौटंकी अाहे. आपण आंदोलन करतोय, १५ दिवस उपोषणउर्वरित. करतोय तरी कोणीच लक्ष देत नाही या नैराश्यातूनच रोहितने आत्महत्या केली. बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर चालणाऱ्या रोहितने आत्महत्येऐवजी संघर्ष करायला हवा होता.
- रोहितची आत्महत्या दुर्देवी आहे. तो अतिशय हुशार होता. देशाने एक चांगला इंटलेक्चुयअल गमावला आहे.
- मीसुद्धा विद्यार्थी नेता होतो. अनेक आंदोलने केली. इथे केवळ फेसबुक पोस्टवरून हा प्रकार घडला आणि राेहितने जीव गमावला हे दुर्दैवी आहे.
- बाबासाहेबांच्या आयुष्यातही संघर्षाचे अनेक प्रसंग आले. पण बाबासाहेब देश सोडून गेले नाहीत किंवा त्यांनी टोकाचा मार्गही अवलंबिला नाही. त्यांनी व्यवस्थेच्या विरुद्ध संघर्ष केला.
- रोहितच्या अखेरच्या पत्रात कोणाचेही नाव नाही. तर त्यात प्रचंड निराशा दिसते. ही निराशा का आली याचेही कारण आहे. सहा महिन्यांपूर्वी मी याचा विद्यापीठात लेक्चर दिले होते. तो १५ दिवस उपोषणाला बसला होता. पण त्याच्याकडे कोणी फिरकलेही नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात थोड्या बहुत प्रमाणात असे घडत असते, परंतु याचे संधीत रूपांतर करणे हे कसब आहे. रोहितला हे जमले नाही. चौकशीतून सत्य बाहेर येईलच, असेही कांबळे म्हणाले.