आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्हैया कुमार ऑगस्ट रोजी शहरात; शिक्षणाच्या बाजारीकरणावर बोलणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठीतील विद्यार्थी नेता कन्हैया कुमार ७ ऑगस्ट रोजी औरंगाबाद शहरात येत आहे. दुपारी ४ वाजता सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात तो शिक्षणाचे बाजारीकरण, खासगीकरण, विद्यापीठांची होणारी बदनामी, देशद्रोह, देशभक्ती, गोरक्षेच्या नावावर होणारा हिंसाचार या विषयावर संवाद साधणार आहे, अशी माहिती मंगळवारी पत्रकार परिषदेत एआयएसएफचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अॅड. अभय टाकसाळ यांनी दिली. 

टाकसाळ म्हणाले, कन्हैयाच्या स्वागतासाठी डाव्या, आंबेडकरवादी, लोकशाही, धर्मनिरपेक्ष विद्यार्थी-युवक संघटनांची समिती स्थापन झाली आहे. कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे. या वेळी प्रा. भारत शिरसाट, सतीश पट्टेकर, आनंद लोखंडे, मुजाहेद पटेल, ऋषिकेश कांबळे उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...